चांदवड : येथील श्रीमान पी.डी. सुराणा कनिष्ठ महािवद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना राखी बांधून वनरक्षणाचा संकल्प करण्यात आला. तसेच सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वयंसेवक विद्यार्थिनींनी राख्या बांधून सामाजिक बंधुभाव वाढविण्याचा प्रयत्न केला. राष्टÑीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बंधुभाव व समरक्षतेसाठी अशा कार्यक्रमाचे महत्त्व प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांनी अधोरेखित केले. यावेळी उपप्राचार्य प्रा.पी.व्ही. ठाकोर, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.एम. जाधव, प्रा. जी.आर. गांगुर्डे आदी उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्त वनरक्षणाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:24 IST