शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या २० ओबीसी गटांना आरक्षणाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:17 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याने पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या २० ओबीसी गटांना न्यायालयाच्या या निर्णयाने धक्का बसणार आहे.

ठळक मुद्देराजकीय गणिते बदलणार : सर्वसाधारण जागांचा टक्का वाढणार

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याने पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या २० ओबीसी गटांना न्यायालयाच्या या निर्णयाने धक्का बसणार आहे.

ओबीसींच्या जागा कमी केल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होईल याविषयी न्यायालयाने स्पष्ट केले नसले तरी, अनुसूचित जाती, जमातींचा आरक्षणाचा टक्का निश्चित असल्यामुळे सर्वसाधारण गटालाच याचा लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्हा परिषदेत सध्या ७३ गट असून, त्यात सर्वसाधारण गटातून १९ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी गटातून २० सदस्य निवडून आले आहेत. अनुसूचित जातींमधून पाच तर अनुसूचित जमातीमधून २९ सदस्य निवडून आले आहेत. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण यापूर्वीच घोषित केल्यामुळे जिल्हा परिषदेत ४१ स्त्रिया व ३२ पुरूष सदस्यांची संख्या आहे. जिल्हा परिषदेची पाच वर्षाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येणार असली तरी, तत्पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द ठरविले आहे. त्याचा प्रभाव पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत जाणवणार असला तरी, आतापासूनच ओबीसी गटातून निवडून आलेल्या सदस्यांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. येत्या निवडणुकीत कोणता गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होईल याचा अंदाज बांधणेही आता कठीण झाल्यामुळे निवडणुकीसाठी तयारी करावी किंवा नाही अशा मनस्थितीत सदस्य सापडले आहेत.हे आहेत ओबीसी गटातील सदस्यजगन्नाथ दशरथ हिरे (निमगाव), ज्योती गणेश जाधव (र्गोटुर्णे), अश्विनी अनिलकुमार आहेर (न्यायडोंगरी), सविता बाळासाहेब पवार (नगरसुल), सुरेखा नरेंद्र दराडे (राजापूर), ज्ञानेश्वर किसन जगताप (लासलगाव), किरण पंढरीनाथ थोरे (विंचूर), बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर (उगाव), यतीन रावसाहेब कदम (ओझर), सिद्धार्थ माणिकराव वनारसे (चांदोरी), सुरेश अर्जुन कमानकर (सायखेडा), यशवंत भगवंत ढिकले (पळसे), शंकरराव झुंबरराव धनवटे (एकलहरे), उदय देवराम जाधव (घोटी), सुनीता संजय सानप (नायगाव), वैशाली दीपक खुळे (मुसळगाव), सीमंतिनी माणिकराव कोकाटे (देवपूर), निलेश देवराम केदार (नांदुरशिंगोटे), शीतल उदय सांगळे (चास), वनिता नामदेव शिंदे (ठाणगाव).

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण