तिडके कॉलनीतील दुर्वांकुर लॉन्स येथे ३० नोव्हेंबरला झालेल्या नाभिक समाजाच्या सर्वसाधारण बैठकीत ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याच्या मुद्द्यावर कर्डक बोलत होते. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्डक यांनी नाभिक समाजालाही पुढे जाण्याचा हक्क असल्याचे सांगितले. मात्र वर्णश्रेणीत तृतीय स्थानी ठेवलेल्या आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये. तसे केल्यास आपल्या समाजाची स्थिती अधिक दयनीय होईल, असे परखड मत कर्डक यांनी मांडले. बैठकीत नाभिक समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरुण सैंदाणे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संजय गायकवाड, दिलीप तुपे, जगदीश सोनवणे,संतोष रायकर, सुरेश सूर्यवंशी, रमेश आहेर, विनायक बोरसे, गणेश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष संगीता बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक शहराध्यक्ष नाना वाघ यांनी केले. विशेष निमंत्रित सदस्य नारायण यादव यांनी स्वागत केले. नभिक युवा सेनेचे नाशिक शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बोराडे यांनी आभार मानले.
---इन्फो----
४१० जातींचे आरक्षण घटवू नये
ओबीसीमध्ये साडेतीनशे जातींचा समावेश असून, ५० भटक्या-विमुक्त जाती, १० एसबीसी असे एकूण ४१० जातींना आरक्षण आहे. त्यात केवळ ३२ टक्के समाज आहे. त्यात गावगाड्यातील मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाने आमच्या ताटातील आरक्षण घेऊ नये. मराठा समाजाला आरक्षण हवे असल्यास त्यांनी इतर मार्गाने, कायद्यात दुरुस्ती करून आरक्षण घ्यावे, असे मत कर्डक यांनी व्यक्त केले.