शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नांदगाव तालुक्यातील ८८ सरपंचपदांचे आरक्षण घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST

नांदगाव : तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी झालेल्या सोडतीत सर्वसाधारण ४५, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) २४, अनुसूचित जाती ६ व ...

नांदगाव : तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी झालेल्या सोडतीत सर्वसाधारण ४५, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) २४, अनुसूचित जाती ६ व अनुसूचित जमातीसाठी १३ असे आरक्षण निश्चित झाले आहे. तालुक्यात गेल्या १५ जानेवारीला ५९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. एकूण ८८ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात आले.

अनुसूचित जातीसाठी वंजारवाडी, वडाळी बु, बोलठाण, बाणगाव खु, तळवाडे, हिसवळ खु, तर अनुसूचित जमातीसाठी जातेगाव, मोहेगाव, पिंपरी हवेली, अस्तगाव, हिंगणे देहरे, मांडवड, वाखारी, श्रीरामनगर, पानेवाडी, अनकवाडे, न्यायडोंगरी, पांझणदेव, हिसवळ बु. असे आरक्षण पडले आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये कळमदरी, नवसारी, भालूर, टाकळी बु, धोटाणे खुर्द, ढेकू खु, कर्ही, परधाडी, सटाणे, रणखेडा, मंगळणे, नांदूर, नागापूर, न्यु पांझण, पळाशी, पिम्प्राळे, पोखरी, फुलेनगर, मळगाव, रोहिले बु, लक्ष्मीनगर, लोहशिंगवे, सावरगाव, सोयगाव या गावांचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी आमोदे, एकवई, कसाबखेडा, कासारी, कुसुमतेल, कोंढार, क्रांतीनगर, खादगाव, खिर्डी, गंगाधरी, गिरणानगर, गोंडेगाव, चांदोरे, चिंचविहीर, जळगाव खु, जळगाव बु, जवळकी, जामदरी, टाकळी खुर्द, तांदुळवाडी, दर्हेल, धनेर, धोटाणे बु, पिंपरखेड, बाणगाव बु, बाभूळवाडी, बिरोळे, बेजगाव, बोयेगाव, बोराळे, भारडी, भौरी, माणिकपुंज, माळेगाव (क), मूळडोंगरी, मोरझर, लोढरे, वडाळी खु, वेहेळगाव, शास्त्री नगर, साकोरा, हिंगणवाडी, हिरेनगर, मल्हारवाडी, दहेगाव या ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले.

मांडवड ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली होती. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले. पदासाठी एकमेव उमेदवार अंकुश हरी डोळे असल्याने ही निवडणूकसुध्दा बिनविरोध झाल्यात जमा आहे.

फोटो- २८ नांदगाव ग्रामपालिका

सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीप्रसंगी तहसीलदार उदय कुलकर्णी, अप्पर तहसीलदार दयानंद जगताप व इतर उपस्थित होते.

===Photopath===

280121\28nsk_29_28012021_13.jpg

===Caption===

 सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीप्रसंगी तहसीलदार उदय कुलकर्णी, अप्पर तहसीलदार दयानंद जगताप व इतर