शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

टॉवरवर अडकलेल्या वानराची तब्बल २० तासांनी सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:39 IST

एकशेवीस फुट उंचीच्या टॉवरवर अडकलेले वानर तब्बल २० तासांच्या कालावधी नंतर जमिनीवर उतरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. सिन्नर तालुक्यातील जायगावकरांनी अनुभवला ऐन दिवाळीत अनुभवला वानराचा थरार.

दत्ता दिघोळे । नायगाव : एकशेवीस फुट उंचीच्या टॉवरवर अडकलेले वानर तब्बल २० तासांच्या कालावधी नंतर जमिनीवर उतरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. सिन्नर तालुक्यातील जायगावकरांनी अनुभवला ऐन दिवाळीत अनुभवला वानराचा थरार.जायगाव येथील पाटील वस्ती जवळील गोविंद रामभाऊ दिघोळे यांच्या शेतातील विजेच्या टॉवरवर गुरूवारी सकाळी कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी चढलेले वानर १२० फुटांवर अडकून पडले. दोन दिवस अन्न आणि पाण्यावाचून व्याकुळ झालेल्या वानराला प्रयत्न करूनही खाली उतरता येत नसल्यामुळे टॉवरच्या टोकावर अडकवून पडले होते.ऐन दिवाळीच्या दिवसात ही घटना घडल्याने शुक्रवारी दिवसभर अडकलेल्या वानराला बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तीव्र उन्हामुळे टॉवरचे लोखंड तापल्याने वानराची होणारी घालमेल, खाली येण्यासाठी होणारी तळमळ व अन्न पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या वानराची अवस्था बघुन उपस्थितीतांची मने हेलावून गेली. दरम्यान पोलीस पाटील भिकाजी गिते यांनी वनविभागाला तर दिघोळे यांनी वीज वितरण विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे, वनरक्षक पी. एल. डावरे, पोपट बिन्नर, वनपाल अनिल साळवे आदीनी घटनास्थळी धाव घेतली. टॉवर उंच असल्याने व सुरू असलेल्या वीजप्रवाहमुळे वानरला खाली उतरण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रमेश हुल्लारे, सोपान दिघोळे, रवींद्र दिघोळे, प्रविण दिघोळे, सचिन गामणे आदीनी टॉवरच्या आजूबाजूला फटाके, राँकेट वाजविले. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजाने वानराने टोकावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी होत असल्याने वानर टप्प्या- टप्याने खाली उतरू लागले.अर्धा तासाच्या कालावधीनंतर वानर जमिनीवर उतरले. दोन दिवस अन्न -पाण्याविना अडकलेले वानर जमिनीवर येताच पाणी, शेंगदाणे व टोमाट्यांवर ताव मारून वानराने तेथून धुम ठोकली. वानर सुखरूप खाली उतरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :NashikनाशिकMonkeyमाकड