शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवेदन : मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा देण्याची मागणी सिन्नर तहसीलवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:41 IST

सिन्नर : विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देसंशयितास फाशीची शिक्षा व्हावीजातीचे दाखले मिळाले पाहिजेत

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव, पवन सोनवणे, विजय बर्डे, किरण मोरे, संजय पवार, वैभव सोनवणे, रतन सोनवणे, नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असली तरी सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व संशयितास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. सिन्नर व निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाले पाहिजेत, आदिवासी बांधवांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे व विंचूरदळवी येथील प्रकरणात अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना देण्यात आले. येथील महात्मा फुले पुतळ्यापासून आदिवासी समाजबांधवांच्या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. जोरदार घोषणाबाजी देत गणेशपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यातून हजारो आदिवासी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात छोटेखानी सभा झाली.आदिवासी समाजावर अन्याय झाल्यानंतर कोणीही राजकारणी पुढे येत नसल्याची खंत उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव यांनी व्यक्त केली. आदिवासी समाजबांधवांच्या भावना तीव्र आहेत. शासन जातीयवादी नसेल तर सदर खटला तातडीने जलद न्यायालयात चालविला जाईल, असे जाधव यांनी सांगितले. अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.सनदशीर मार्गाने प्रश्न सुटत नसेल तर...लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आदिवासी समाजबांधवांनी मोर्चा काढून शासन दरबारी जाब मागण्याचा प्रयत्न केला असल्याचे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले; मात्र न्याय मिळणार नसेल तर शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकण्यात येईल. विंचूरदळवीच्या तपासात त्रुटी राहता कामा नये. आदिवासी बांधव शिक्षण व बुद्धिमत्तेची लढाई एकवेळ हारतील; मात्र दोन हाताच्या लढाईत आदिवासी समाज आजपर्यंत हरला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ४-५ दिवसात या मोर्चाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथे मोर्चा काढण्याचा इशारा ढवळे यांनी दिला. त्यानंतर मुंबई येथे मोर्चासाठी समाजबांधवांनी तयार राहावे, असे ढवळे यांनी सांगितले.