नाशिकरोड : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी चालू अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.गौडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी. तसेच पुढील वर्षी नाशिक येथे सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर जलद गाड्यांना नाशिक थांबा मिळावा, तसेच पश्चिम व मध्य रेल्वे जोडण्यासाठी नाशिक-वापी या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी. नाशिककरांसाठी मुंबईला दररोज ये-जा करण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस ही महत्त्वाची प्रवासी गाडी असल्याने बोगी वाढवून द्यावी, मनमाड-कुर्ला राज्यराणी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: July 23, 2014 00:25 IST