येवला : सध्याचे पीककर्ज नूतनीकरण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह भरून पुन्हा कर्ज उपलब्ध करून दिले जाते; परंतु सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व नापिकीमुळे शेतकऱ्यांजवळ एवढे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे ती रक्कम एकतर खासगी सावकार किंवा कुणाकडून हातउसने घेऊन नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्त्येशिवाय पर्याय राहत नाही. या पार्श्वभूमीवर पीककर्ज नूतनीकरण हे फक्त व्याज भरून करून देण्यात यावे, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे येवला तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे व भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. गोविंदराव भोरकडे यांनी राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना दिले.यावेळी निवेदनावर चर्चा करताना भुसे यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सक्षम बनवण्यास आवश्यक ती सर्व मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. पीककर्जाच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांना भांडवलाअभावी पीककर्ज नूतनीकरण करणे शक्य नसेल त्यांच्यासाठी सरकारने पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे ठरवले असून, आता शेतकऱ्यांना ते कर्ज पाच वर्षांत वार्षिक हप्त्याने भरता येणार असून, कर्ज परतफेड सुलभ होणार असल्याचे सांगितले. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)रेसलिंग स्पर्धेत खेळाडूंचे यशयेवला : राज्यस्तरीय ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचव्या राज्यस्तरीय ट्रेडिशनल रेसलिंग स्पर्धेत येवला तालुक्यातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादित करून सुवर्णपदक पटकावले.शिर्डी येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत ७० किलो वजनी गटात प्रसाद राजू सोनवणे व ७५ किलो वजनी गटात राहुल प्रवीण पवार यांनी नेत्रदीपक कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूंना नाशिक जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंगचे अध्यक्ष संतोष देशमुख व चेतन इघे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालय व श्रीमान गंगाराम छबिलदास उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रसाद सोनवणे याने यापूर्वीदेखील राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून येवला शहराच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला होता. (फोटो ०२ प्रसाद सोनवणे, ०२ राहुल पवार)
भाजयुमोतर्फे राज्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
By admin | Updated: February 3, 2016 22:32 IST