शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

ग्रामसेवकांचे तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: December 1, 2015 23:33 IST

ग्रामसेवकांचे तहसीलदारांना निवेदन

नांदगाव : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासोबतच सर्वेक्षण करण्याची सक्ती करू नये, असे निवेदन देणाऱ्या ग्रामसेवकावरच पोलीस कारवाई करणाऱ्या खेड जिल्हा रत्नागिरी येथील तहसीलदार कदम यांच्यावर निलंबन करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत तालुक्यातील ग्रामसेवकांच्या संघटनेने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलने केले.ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायतीची कामे त्यासोबतच विविध योजनांची अंमलबजावणी व राज्यातील दुष्काळ निवारण उपाययोजन, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, मजुरांना रोजगार आदि स्वरूपाचा प्रचंड व्याप असताना ग्रामसेवकावर लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याची अतिरिक्त जबाबदारी टाकू नये, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे; मात्र संघटनेने त्यास विरोध करीत त्याबाबतचे निवेदन खेड येथील तहसीलदारांना देण्याचा प्रयत्न केला असता, जाणीवपूवक ग्रामसेवकावर पोलिसातर्फेखोटे गुन्हे नोंदवित ग्रामसेवकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप निकम, बाळासाहेब सरोदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन दिले. यावेळी एच. पी.दराडे, जे.के. वाघ, एस.जे. बोरसे, बी.व्ही. जाधव, एस.बी. मोहिते, बी.एस. गेंद, ए. बी. सोनवणे, पी. के. थोरात, सी.पी. जगताप, एन. के. अमृतकर, ए.जे. गांगुर्डे, जी. टी. खैरनार आदि उपस्थित होते.पेठ : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन पेठ शाखेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करून तहसीलदार कैलास कडलग यांना निवेदन दिले.राज्यभर ग्रामसेवकांकडे विविध अभियाने, योजना, दुष्काळ निवारण, पाणीटंचाई, मजुरांना रोजगार यासारखी इतर अनेक कामे असतात. त्यांच्याकडे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सर्वेक्षण व अद्ययावतीकरणाचे निवेदन देण्यात आले; मात्र दि. २१/१०/२०१५ रोजी राज्य संघटनेने निवेदन मंत्रिमहोदय व प्रधान सचिवांना मुंबई येथे देऊन आदरपूर्वक हे काम नाकारले. खेड, जि. रत्नागिरी येथील तहसीलदार अमोल किसन कदम यांनी विनाचौकशी आकस बुद्धीने ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या या बेकायदेशीर कृत्याबद्दल पेठ तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार कैलास कडलग यांना निवेदन दिले.