शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

सातपूर परिरसरात शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

जनता विद्यालय : सातपूर गावातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

जनता विद्यालय :

सातपूर गावातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर भारत स्काऊट गाईड ध्वजाचे आरोहन प्राचार्य साहेबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. उपमुख्याध्यापिका उषा कदम यांनी संविधान वाचन केले. एन.सी.सी.अधिकारी रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. पथकाच्यावतीने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी शालेय समितीचे रामनाथ शिंदे, भास्कर बंदावणे, शिवाजी मटाले यांच्यासह सखाराम घाटोळ, दौलत निगळ, चंद्रकांत निर्वाण,राजाराम निगळ,दादा निगळ, नितीन निगळ, दशरथ निगळ, छगन भंदूरे, स्वाती भंदूरे, माधुरी भूजबळ, कुसुम घाटोळ, निलम देशमुख, रमेश तासकर, प्रमोद कांगुणे, गोविंद कोठावळे, रमेश तुंगार, संजय सावंत, भालचंद्र ठाकरे, सुनीता पदाडे, स्वाती होळकर आदींसह पालक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य साहेबराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री बस्ते, सविता ठाकरे यांनी केले.

महापालिका जिजामाता शाळा :

सातपूर कॉलनीतील मनपाच्या जिजामाता शाळेत नगरसेवक सलीम शेख, नगरसेविका दीक्षा लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य रामहरी संभेराव, बाळासाहेब पोरजे, सुखदेव पगारे, गौरव आहेर, पाशा पाटील, विजय उल्लारे आदी उपस्थित होते. बीएलओचे उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल शाळा क्र.२८ चे शिक्षक दत्तात्रय शिंपी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक केंद्रप्रमुख नितीन देशमुख यांनी केले. मुख्याध्यापिका छाया गोसावी व सुनेत्रा तांबट यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले. सचिन चिखले यांनी आभार मानले. यावेळी शाळा क्रमांक २७,२८ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय

सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात उद्योजक अनिल धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख, माजी नगरसेवक नंदू जाधव संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, चिटणीस प्रा. डॉ. के. के.जाधव, खजिनदार संपतराव आहेर, सदस्य नरेंद्र वाणी, बन्सीलाल रायते, पंढरीनाथ शिंदे,नारायण पवार, बी. एल. चव्हाण,अक्षय धुमाळ, बाळासाहेब जाधव, नामदेव पाटील, रामहरी संभेराव, डॉ.सुनील आंधळेे, अशोक पालक, संपत हराळ, सुलोचना गांगुर्डे, प्रल्हाद रायते आदींसह पालक उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक सखाराम पवार यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुदाम दाणे यांनी केले. सूत्रसंचालन उज्ज्वला जगदाळे यांनी केले. आण्णासाहेब गुंडगळ यांनी आभार मानले.

मनपा शाळा क्रमांक ३२:

संतोषीमातानगर येथील मनपा शाळा क्रमांक ३२ मध्ये नगरसेविका दीक्षा लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भुजबळ,ज्योती प्रधान,धर्मा पाईकराव, वाघमारे,गायकवाड,शेजवळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी केले. स्वागत मनीषा ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी धूम यांनी केले. सारिका लिटे यांनी आभार मानले. यावेळी महिला, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महादेवनगर येथील मनपा शाळा क्रमांक ३३ :

येथे नगरसेवक योगेश शेवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख,नगरसेविका सीमा निगळ,दीक्षा लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, बाळासाहेब पोरजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका छाया तिवडे यांनी केले. यावेळी अरुण काळे, संजय तायडे, अनिल मौले, विजय अहिरे, भगवान सोनार, संजय सोनवणे आदींसह पालक उपस्थित होते. स्वागत सुनंदा सोनार, मंगला शेलार यांनी केले. सूत्रसंचालन कांचन बडगुजर यांनी केले. उज्ज्वला आहेर, पुष्पवती मेनकर यांनी आभार मानले.

आनंदवली येथील मनपाच्या शाळा क्रमांक १८:

नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजपूजन राधा बेंडकोळी यांनी केले. केंद्रप्रमुख कैलास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव कडलग, दशरथ लोखडे, अरुण काळे, शरद मंडलिक, अशोक जाधव आदी उपस्थित होते. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील कामाठी दिलीप बोलकर यांना सापडलेली सोन्याची चेन अर्चना तिटकारे यांना परत केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णूपंत बेंडकोळी,भरत गांगुर्डे, कैलास जाधव,विलास आहेर, राजू जाधव, नारायण जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवृत्ती शेवरे, बाळासाहेब मंडलिक, सलीम शेख, विष्णू शिंदे, दिनेश सूर्यवंशी आदींसह पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन तनुजा देवरे यांनी केले. शेखर जाधव यांनी आभार मानले.

स्वारबाबानगर येथील मनपा शाळा क्रमांक २६,३०,३१ मध्ये नगरसेविका दीक्षा लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र लाहोरी, सलीम शेख,समाधान जगताप, अजयसिंह,विक्की लोंढे आदी उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते वाटपाडे, अन्सारी या शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.