शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘पोस्टर्स बॉइज’ मनपा अधिकाºयांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:16 IST

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना महापालिकेतील कोणत्याही अधिकाºयाला स्वत:चे छायाचित्र झळकविण्यास शासनाने मनाई केली आहे. शासन निर्णय डावलून जाहिरातीत झळकणाºया ‘पोस्टर्स बॉइज’ अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक : राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना  महापालिकेतील कोणत्याही अधिकाºयाला स्वत:चे छायाचित्र झळकविण्यास शासनाने मनाई केली आहे. शासन निर्णय डावलून जाहिरातीत झळकणाºया ‘पोस्टर्स  बॉइज’ अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा प्रसार, प्रचार करण्यासाठी महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावले जातात शिवाय जाहिरातही केली जाते. या जाहिरातींत प्रामुख्याने महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांचे छायाचित्र झळकविले जाते, तर सोबत प्रशासन प्रमुख आयुक्तांचेही छायाचित्र टाकण्याचा पायंडा पडलेला आहे. या जाहिरातबाजीबाबत महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेषाधिकार भंगाच्या सूचनेवर चर्चा झाली होती. त्यावेळी वित्तमंत्र्यांनी सदर जाहिरातबाजीबाबत कारवाई करण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने परिपत्रक काढले असून, त्याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परिपत्रकानुसार, विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना कोणत्याही अधिकाºयांनी स्वत:चा फोटोटाकू नये याबाबत दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने त्याबाबतचे परिपत्रक सर्व खातेप्रमुखांना पाठविले असून, काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.