शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच परिषदेसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रतिनिधी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 18:46 IST

नाशिक : राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी शिर्डीत होत असलेल्या सरपंच, उपसरपंच ...

नाशिक : राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी शिर्डीत होत असलेल्या सरपंच, उपसरपंच परिषदेसाठी नाशिक जिल्ह्यातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरपंच परिषदेबाबत सोमवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी माहिती दिली. सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्यावे, सरपंचांमधून एक आमदार प्रतिनिधी निवडावा, कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या सरपंचांसाठी स्वतंत्र कक्ष असावा आदी जवळपास २५ मागण्यांसाठी सरपंच परिषद काम करत आहे. या परिषदेस सरपंच, उपसरपंच यांच्यासह ३५१ पंचायत समितींचे सभापती व राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या सभापतींनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सरपंच परिषदेसाठी उपस्थित राहण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांना प्रवास भत्ताही मंजूर करण्यात आला आहे. परिषदेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्य संघटक अविनाश आव्हाड, जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे आदी उपस्थित होते.चौकट===ग्रामपंचायत निधीतून प्रवासखर्चया परिषदेला येण्यासाठी सरपंच, उपसरपंच यांना ग्रामपंचायत स्वनिधीतून खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून २८१९ सरपंच, उपसरपंच या परिषदेसाठी उपस्थित राहणार असून, यासाठी ५६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक