शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तीनशेहून अधिक रुग्णांचे अहवाल खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 00:02 IST

नाशिक : कोरोना संशयितांच्या घसा स्रावाचे नमुने तपासण्यासाठी शहरात प्रयोगशाळा मंजूर झाली खरी, परंतु त्यानंतर खुद्द नाशिक शहरातील संशयितांचे नमूनेच तपासून येत नसल्याचे दिसत आहे.

नाशिक : कोरोना संशयितांच्या घसा स्रावाचे नमुने तपासण्यासाठी शहरात प्रयोगशाळा मंजूर झाली खरी, परंतु त्यानंतर खुद्द नाशिक शहरातील संशयितांचे नमूनेच तपासून येत नसल्याचे दिसत आहे. नाशिक शहरातील नमुन्यांंपेक्षा ग्रामीण भागातील नमुन्यांना प्राधान्याने जिल्हा शल्य चिकित्सक तपासणीसाठी पाठवतात. मात्र, त्यानंतर रखडलेले सुमारे तीनशे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेतून तपासणीसाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आरोग्य संचालकांची परवानगी घेतली. मात्र, त्यानंतर दोन दिवस झाले तरी शल्य चिकित्सकांनी हे नमुने पुण्याला पाठविलेच नाही. ही बाब कळताच मनपा आयुक्तांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना नोटीस बजावली आहे.नाशिक शहरात कोरोनाबधितांची संख्या मर्यादित होती तोपर्यंत अडचण नव्हती. मात्र आता कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एक बाधित रग्ण आढळल्यानंतर त्याचे घर केंद्रस्थानी ठेवून पाचशे मीटर परिघाचे क्षेत्र सील केले जाते. त्यानंतर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथके नियुक्त करून घर सर्वेक्षण केले जाते. बाधिताच्या कुटुंबातील आणि त्याच्या अतिजोखमीच्या व कमी जोखमीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर संशयित रुग्णांच्या घसा स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. शहरात बाधितांची संख्या २१ तर झाली आहेच परंतु अगोदरच्या संशयित रुग्णांचे नमुनेच वेळेवर मिळत नसल्याने अडचण होत आहे. शहरात प्रयोगशाळा असतानाही प्रत्यक्षात पाच ते सात दिवस झाले तरी कोरोना तपासणी अहवाल मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.-----------आता संशयित रुग्ण ठेवायला जागा नाहीमहापालिकेने संशयित रुग्ण देखभालीसाठी तपोवन आणि अन्यकाही ठिकाणी ठेवले असले तरी आता मात्र, संबंधितांची संख्या वाढल्यास त्यांना क्वॉरंटाइन करण्यासाठी मनपाकडे जागाच नाही. त्यामुळे अनेकांना होम क्वॉरंटाइन करून ठेवले जात आहे. त्यातचसध्या तपोवन किंवा नमुने घेतल्यानंतर अनेकांना त्यातील कोण बाधित आहे, हे कळत नसल्याने या विलंबातच एखाद्याला लागण होण्याची शक्यता आहे. ही खरी चिंता असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.--------------------मनपा आयुक्तांची आरोग्य संचालकांशी चर्चाजुने प्रलंबित नमुने आणि नवीन नमुने यात घोळ नकोम्हणून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थेट आरोग्य संचालकांशी थेट चर्चा केली. त्यांनी पुण्यातील प्रयोगशाळेतएक दिवस फक्त महापालिकेचे नमुने तपासून देण्याचे मान्य केले आणि एक दिवस पूर्णत: अन्य कुठलेही नमुने घेतले नव्हते. परंतु जिल्हा शल्य चिकित्सकांनी दोन दिवस हे नमुनेच पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले नाही. अखेरीस आयुक्त गमे यांनी डॉ. जगदाळे यांना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक