शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून आलेल्यांची माहिती त्वरित कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:03 IST

नाशिक : कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिककरांच्या दृष्टीने येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

नाशिक : कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिककरांच्या दृष्टीने येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.त्याचप्रमाणे मालेगावमध्ये असलेल्या दाट लोकवस्तीमुळे या रोगाचा प्रसार होण्याचे संभाव्य प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी परदेश, परराज्य अथवा पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ प्रशासनास देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यात २८ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर आजपर्यंत ती संख्या १३ वर गेली आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहून घरातच थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यावर गर्दी करणे, विनाकारण लॉकडाउन कालावधीत फिरणे या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.या विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याकडे उशिराने झाल्यामुळे अजूनदेखील सर्व परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासर्व यंत्रणा अतिशय उत्कृष्टपणे उपायोजना करून आपली जबाबदारी पार पाडीत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. त्याचप्रमाणे विशेष करून मालेगावमध्ये पावरलूमचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांची फुप्फुसांची क्षमता कमी आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी टीबीचे पेशंट जास्त आहेत, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगची सर्व नियम पाळणे अत्यावश्यक आहे. जे कोणी संचारबंदी कालावधीत नियमांचा भंग करेल त्यांच्याविरु द्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक