शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कळवण : सभापती, उपसभापतीपद राष्ट्रवादीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 16:10 IST

कळवण-: येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवाणे पंचायत समतिी गणाच्या सदस्य मीनाक्षी शिवाजी चौरे तर उपसभापतीपदी कनाशी पंचायत समिती गणाचे सदस्य विजय दत्तात्रेय शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली.

कळवण-: येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवाणे पंचायत समतिी गणाच्या सदस्य मीनाक्षी शिवाजी चौरे तर उपसभापतीपदी कनाशी पंचायत समिती गणाचे सदस्य विजय दत्तात्रेय शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली. पाटविहीर गावाला सभापती तर कनाशी गावाला उपसभापतीपदाची या निमित्ताने दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता आहे.सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला निघाल्याने या पदासाठी मीनाक्षी चौरे व मनीषा पवार ही दोन चर्चेत होती. आशा पवार यांना यापूर्वी सभापतीपदावर संधी मिळाली आहे.बाजार समिती सभागृहात आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, रविंद्र देवरे, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, हेमंत पाटील यांची पंचायत समतिी सदस्यासमवेत बैठक होऊन सभापतीपदासाठी मीनाक्षी चौरे व उपसभापतीपदासाठी विजय शिरसाठ यांना संधी देण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर निवडणुकीचा शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आला .राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेसच्या सदस्यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी करु न आघाडीचा धर्म पाळला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार बी ए कापसे व सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी डी एम बहीरम यांनी काम पाहिले. सभापती व उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनाक्षी चौरे व विजय शिरसाठ यांनी निर्धारित वेळेत एकमेव चार अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी ए कापसे यांनी सभागृहात केली.निवडीप्रसंगी सभागृहात जिल्हा परिषदेचे गटनेते यशवंत गवळी, माजी सभापती रविंद्र देवरे, बाजार समतिीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, हेमंत पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, जेष्ठ नेते पोपटराव बिहरम, लालाजी जाधव, सौ पल्लवी देवरे सौ आशाताई पवार,जगन्नाथ साबळेद्ब, सौ मनिषा पवार, अतुल देवरे ,सुनील देवरे, शिवाजी चौरे, विलास रौदळ, उत्तम जगताप , रामा पाटील, शांताराम चौरे, बाळासाहेब गांगुर्डे आदींसह तालुक्यातील बहुसंख्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक