शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

सटाण्यात साकारल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती

By admin | Updated: October 30, 2014 22:21 IST

इतिहासाची ओळख : नागरिकांचा प्रतिसाद

सटाणा : नव्या पिढीला गड-किल्ल्यांची ओळख व्हावी या उद्देशाने सटाणा शहरातील स्वयंभू संकुलानजीक शिवकालीन गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सदर प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.शिवकालीन इतिहास जतन करण्यासाठी येथील शिवप्रेमी मित्रमंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील दीपावलीच्या सुट्ट्यांमध्ये शिवकालीन गडकिल्ल्याच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून, या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवकाळातील प्रतापगड, सिंहगड, राजगड, रायगड, साल्हेर, मुल्हेर किल्ले, पुरंदरचा किल्ला आदिंसह लहान-मोठ्या किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा दुर्ग महामंडळ उभारण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे. शिवकालीन ऐतिहासिक स्थळांवर पर्यटक व गिर्यारोहकांसाठी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केल्यास मराठी माती व संस्कृतीचा संस्कार रुजविण्यास निश्चितच मदत होईल.शिवछत्रपतींबद्दल जनमाणसात अढळ स्थान आहे. परंतु व्यापक दृष्टिकोनातून शिवचरित्र असण्याबाबत सामाजिक पातळीवर उदासीनता असल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, बालक, युवक आदि समाजातील सर्व घटकांनी ठिकठिकाणी शिवकालीन गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारणे शक्य आहे. अन्य उत्सवांप्रमाणे या उपक्रमांसाठी लोकवर्गणीची आवश्यकता नसून, दगड-माती व कल्पकतेच्या बळावर गडाची उभारणी करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. (वार्ताहर)