शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना दाखले देण्यासाठी चार रुग्णालयांचे फेरनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:40 IST

जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी उडणारी झुंबड आणि दिव्यांगांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. तसेच या दाखल्यांसाठी आठवडाभरातील दिवसांचेदेखील फेरनियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसुविधा : ग्रामीण व शहरी भागात प्रत्येकी दोन रुग्णालये

नाशिक : जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी उडणारी झुंबड आणि दिव्यांगांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. तसेच या दाखल्यांसाठी आठवडाभरातील दिवसांचेदेखील फेरनियोजन करण्यात आले आहे.दिव्यांग दाखल्यांसाठी जिल्हा रुग्णालयात वर्षभर गर्दी दिसून येते. त्यामुळे दाखले वितरणात अनेकदा गोंधळ उडण्याचे, डॉक्टर उशिरा येण्याने तिष्ठत रहावे लागण्याचे प्रकार अनेकदा घडले आहे. दाखले वाटपातील या त्रुटींवर दिव्यांगबांधव तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून अनेकदा रोष व्यक्त होण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. शहरातील मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींसाठी जेडीसी बिटको व डॉ. झाकीर हुसेन रु ग्णालयात प्रमाणपत्र वितरित करण्याची सुविधा उपलब्ध असतानाही शहरातील दिव्यांग व्यक्ती जिल्हा रुग्णालयात गर्दी करीत होते. संपूर्ण जिल्ह्णातील दिव्यांग व्यक्ती जिल्हा रुग्णालयात येत असल्याने जिल्हा रुग्णालयावर दाखले वितरणाचा अतिरिक्त ताण येत होता. ही बाब ओळखून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने प्रमाणपत्र वितरणात सुलभता यावी, यासाठी तालुकानिहाय रुग्णालयांचे फेरनियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींच्या दाखल्यांसाठी कमी काळ ताटकळण्याची वेळ येणार असून, काही प्रमाणात तरी लवकर दाखले उपलब्ध होऊ शकणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटलDivyangदिव्यांग