शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:07 IST

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने कनव्हर्जन अंतर्गत पुरातत्त्व खात्याच्या वतीने सुंदरनारायण मंदिराचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे राबविण्यात येत असलेले काम नागरिकांनी बंद पाडले आहे. संपूर्ण मंदिराचे दगड बदलण्याची नागरिकांची मागणी असून, ठेकेदार तयार नसल्याने वाद निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी कंपनीची बैठक आणि वार्षिक सभा होत असतानाच ही सलामी मिळाली आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने कनव्हर्जन अंतर्गत पुरातत्त्व खात्याच्या वतीने सुंदरनारायण मंदिराचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे राबविण्यात येत असलेले काम नागरिकांनी बंद पाडले आहे. संपूर्ण मंदिराचे दगड बदलण्याची नागरिकांची मागणी असून, ठेकेदार तयार नसल्याने वाद निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी कंपनीची बैठक आणि वार्षिक सभा होत असतानाच ही सलामी मिळाली आहे.अर्थात, कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी शुक्रवारी (दि. २८) हा विषय मांडला आहे. तथापि, त्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय कंपनीच्या बैठकीत झालेला नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत कनव्हर्जनचा भाग म्हणून पुरातत्त्व खात्याने नाशिकच्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. सदरचे मंदिर हे चारशे वर्षांपूर्वीचे असून, पुरातत्त्व खात्याने संग्रहित केले आहे. त्यामुळे नूतनीकरणाची जबाबदारी प्रामुख्याने पुरातत्त्व खात्याची आहे, त्याअनुषंगाने गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. या मंदिराचे जीर्ण पाषाण बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी ठेकेदाराने खास कारागीर बोलवून दगड घडविण्याचे काम सुरू आहे. परंतु, केवळ मंदिराचे जे दगड खराब झाले आहेत तेच बदलण्यात येतील, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. तर संपूर्ण मंदिराचे दगड बदलावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात नागरिकांशी ठेकेदाराचे वाद झाल्यानंतर शाहू खैरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मूळ करारात काय नमूद आहे केवळ खराब झालेले दगडच बदलण्यात येणार आहेत की, सर्वच दगड बदलण्याची तरतूद आहे, यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पुरातत्त्व खात्यातील अधिकारी घारपुरे यांनी सरकारवाड्याच्या नूतनीकरणाचे काम स्वारस्य घेऊन पूर्ण केले, त्यांच्याच काळात हे काम सुरू झाले परंतु आता घारपुरे निवृत्त झाल्याने नूतन अधिकाºयांकडे पुरेशी माहिती नसल्याचे खैरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे संबंधित ठेकेदार पोलीस तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.केवळ खराब दगडच बदलणारसुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणात दगड बदलण्यासाठी ठेकेदाराने खास कारागीर आणले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात दगड घडविले आहेत; मात्र ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार केवळ खराब दगडच बदलण्यात येणार आहेत. मग, मोठ्या प्रमाणात दगड का घडविण्यात आले हा परिसरातील नागरिकांचा खरा संशयाचा मुद्दा आहे.

टॅग्स :TempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळे