शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

दीडशे कोटीचे कर्ज काढण्यास मान्यता पालिकेला दिलासा: एकूण साडेतीनशे कोटींचे ऋण काढणार

By admin | Updated: May 24, 2014 00:50 IST

नाशिक : नेहरू अभियानातील कामे आणि आता कुंभमेळ्याची पूर्वतयारी यामुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या महापालिकेला आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण साडेतीनशे कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मान्यता मिळाली आहे.

नाशिक : नेहरू अभियानातील कामे आणि आता कुंभमेळ्याची पूर्वतयारी यामुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या महापालिकेला आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण साडेतीनशे कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाने कालच हा निर्णय घेतला असून, महापालिकेला तो प्राप्त झाला आहे. महापालिकेला नेहरू अभियानांतर्गत कामे पूर्ण करणे, शहरातील रस्ते विकसित करणे, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत कामे करण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार दोनशे कोटी रुपये इतकेच दीर्घ मुदतीचे कर्ज उभारण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. दरम्यान, महासभेच्या ठरावानुसार आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ डिसेंबर २०१३ रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने महत्त्वाची विकासकामे आणि रस्ते तसेच सिंहस्थ पूर्व कामांसाठी कर्ज उभारण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. कर्ज उभारणीसाठी प्राप्त झालेले व्याजदर आणि अटी, शर्ती अंतिम मंजुरीनंतर राज्य शासनाला पाठविणे आणि शासनाची मंजुरी घेणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे महापालिकेची कोणतीही मालमत्ता शासनाच्या मान्यतेशिवाय गहाण ठेवता येणार नाही,अशा दोन अटी राज्य शासनाने घातल्या आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.नाशिक महापालिकेने नेहरू नागरी अभियानात सहभाग घेतल्यानंतर एकूण प्रकल्पाच्या तीस टक्के रक्कम महापालिकेलाच खर्च करावी लागणार होती. परंतु अनेक कामांसाठी पालिकेला पन्नास टक्क्यांच्या आसपास रक्कम खर्च करावी लागली आहे. त्याचप्रमाणे आता सिंहस्थ कामांसाठी आर्थिक बोजा महापालिकेची मोठी अडचण झाली होती. परंतु आता पालिकेची आर्थिक टंचाई काही प्रमाणात दूर होणार आहे.दुसर्‍यांदा इतके मोठे कर्जमहापालिकेने यापूर्वी शंभर कोटी रुपयांचे मोठे कर्ज १९९९-२००० मध्ये काढले होते. कॉँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना कर्जरोख्यांद्वारे ही रक्कम उभी केली होती. त्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज काढले जात आहे.अगोदरची कर्जप्रक्रिया प्रलंबितचमहापालिकेला यापूर्वी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. परंतु महापालिकेने वर्ष होत आले तरी अद्याप कर्ज काढलेले नाही. बॅँकांकडून प्रस्ताव मागविण्यातच कालहरण झाले आहे. त्यामुळे आता हे नव्याने मंजूर झालेले कर्ज कधी काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.