शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन तासांत हटविले गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:50 IST

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़

पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़ त्यामुळे नागरिकांच्या जिवापेक्षा महापालिकेने परवानगीचा मुद्दा पुढे करून ही कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़ दरम्यान, यामुळे महापालिका व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये जुंपण्याची शक्यता असून, मनपाच्या या कृत्यावर सोशल मीडियामधून संताप व्यक्त केला जात आहे़तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने अपघाताचा हॉट स्पॉट म्हणून तारवालानगर चौफुलीची ओळख निर्माण झालेली होती़ या अपघातांना आळा बसावा यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिका व पोलीस प्रशासनाकडे गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती़ दोन दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्याच्या सहकार्याने गतिरोधक टाकण्याचे काम करण्यात आले होते. या गतिरोधकामुळे अपघातांना निश्चितपणे आळा बसेल, असा विश्वास नागरिकांमध्ये होता़ मात्र, या गतिरोधकावर महापालिका प्रशासनाची वक्रदृष्टी पडली अन् अवघ्या दोन तासांतच चौफुलीवर टाकलेले गतिरोधक महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले.महापालिकेने दोन तासांपूर्वी टाकलेले गतिरोधक काढल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी मनपाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर महापालिकेचा जाहीर निषेध नोंदविला़ अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून गतिरोधक बसविण्याची कार्यवाही केली जाते तर मनपा तेच गतिरोधक उखडून टाकण्याचे काम करीत असल्याने पोलीस व मनपा महापालिका यांच्यातील वादामुळे गतिरोधक बसविण्याच्या कामाला सध्या तरी ब्रेक लागला आहे.महापौरांचा  जाण्या-येण्याचा रस्तानाशिक शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजनाताई भानसी या दररोज याच रस्त्याने ये-जा करतात़ या ठिकाणी होणाºया अपघातांचीही त्यांना जाणीव आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावर क़ का़ वाघ महाविद्यालया जवळ टाकलेल्या गतिरोधकांमुळे अपघातांना आळा बसला आहे़ त्याप्रमाणे तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक टाकल्यास अपघातांना नक्कीच आळा बसेल़ त्यामुळे महापौरांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती नागरिकांनी केली आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा