शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

टिळक, साठे यांचे स्मरण

By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST

जागर कार्याचा : शहरात पुण्यतिथी-जयंतीचा संयुक्त कार्यक्रम

लोकमत चमू ल्ल नाशिकभारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या महापुरुषांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. शाळा-महाविद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी टिळक आणि साठे यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे या महापुरुषांच्या कार्याचा गौरव केला.अखिल भारतीय मांतग संघलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मातंग संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने अण्णा भाऊ साठेनगर, वडाळा शिवार येथे जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले. साठे यांच्या प्रतिमेस संघाचे जिल्हाध्यक्ष गमाजी घोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सचिव सुभाष रणखांब, संघटक आत्माराम लगड, सरचिटणीस आसाराम घाटुळ, रखमाजी पवार, दत्ता काळे, भागवत कांबळे, ओंकार सपकाळे, संजय रणखांब, राजू हिवाळे, ज्ञानेश्वर पारखे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.नाशिक नवनिर्मिती संस्थायेथील नाशिक नवनिर्मिती बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फेविविध नृत्य आणि गीते सादर करून अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. नटराज कला अकादमीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र मप्रसंगी अकादमीचे सभासद प्रथमेश जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जय मल्हार’, ‘ओमकार स्वरूपा’ व इतर गाण्यांवर नृत्य व गाणे सादर केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव नितीन कोळेकर, मार्गदर्शक अ‍ॅड. अमोल घुगे, वैभव पिंगळे, राहुल भोपळे, प्रतीक्षा शेळके, काजल भरीत, समाधान जाधव, विशाल गांगुर्डे, अंबादास बरफ, मोनिका चौधरी, ज्योती भावसार, सविता महाले, प्रियांका शिंदे, रोहिणी पवार, ममता भोये, धनश्री कोचुरे, पूजा गाडेकर, अश्विनी भोसले आदि उपस्थित होते.संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळसंत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळ संचलित अभ्यासिकेमध्ये लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे सरचिटणीस भा. द. तानपाठक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभ्यासिकेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, खजिनदार सुभाषचंद्र अग्रवाल, राजेश शेळके, कैलास आंबेकर, किरण टिळे, भुपेंद्र जोशी, संकेत देसाई, ज्योती कुमावत, नीलिमा शेलूकर, शोभा गंगेकर, प्रशांत पाटील, संगीता सोनवणे, सुनीता पिंगळे तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ओम आनंद ट्रस्टतर्फे मोफत पुस्तके वाटपलोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्ताने ओम आनंद सेवा ट्रस्टच्या वतीने पंचवटीतील महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिरमधील ११० गरजू विद्यार्थ्यांना सुलेखन पुस्तक संचाचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सचिन मोरे, सचिव संदीप मोरे, सदस्य वनिता मोरे व वैशाली मोरे, तसेच महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष गं. पां. माने, सुनंदा माने, मुख्याध्यापक आशा जाधव व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. सचिन मोरे यांनी आभार मानले.रवींद्र मंडळ प्राथमिक शाळालोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे जयंती व नागपंचमी साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापक पवार यांनी प्रतिमापूजन केले. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व खाऊ देण्यात आला. सूत्रसंचालन पाडवी यांनी केले. नागपुरे, जाधव, जोशी, वाघ उपस्थित होते.म्हसरूळ सार्वजनिक वाचनालयम्हसरूळ सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सभासद वसंत कुलकर्णी, भास्कर राजगुरू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्ष वसंतराव मोराडे यांचे भाषण झाले. स्वागत ग्रंथपाल विनोद खैरनार यांनी, तर सूत्रसंचालन विनायक सूर्यवंशी यांनी केले. खजिनदार विठ्ठलराव धनाईत यांनी आभार मानले. प्रकाश उखाडे, देवकिसन व्यास, पद्माकर मोराडे, योगेश मोराडे, कल्पना विसे, विकास घडोजे, प्रकाश जाधव आदि यावेळी उपस्थित होते.