शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विविध चर्चमध्ये ‘गुड फ्रायडे’निमित्त स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:51 IST

सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजला जाणारा ‘गुड फ्रायडे’ शुक्रवारी (दि.३०) दिवस शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी युवकांनी पथनाट्याद्वारे येशुंच्या सुळावर चढविल्याचा प्रसंग भाविकांसमोर सादर करण्यात आला.

नाशिक : सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजला जाणारा ‘गुड फ्रायडे’ शुक्रवारी (दि.३०) दिवस शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी युवकांनी पथनाट्याद्वारे येशुंच्या सुळावर चढविल्याचा प्रसंग भाविकांसमोर सादर करण्यात आला. त्यानंतर मुख्य धर्मगुरू फादर ब्रायन डिसोझा, केनेथ डिसोझा, फादर वेन्स्ली डिमेलो यांनी विशेष प्रार्थना, मार्गदर्शन केले. गुड फ्रायडेनिमित्त रक्तदान शिबिर, तपसाधना व वंचितांसोबत भोजन आदी उपक्रम राबविण्यात आले. संध्याकाळी येशूंच्या बलिदानाची आठवण हा कार्यक्रम झाला. संत आंद्रिया चर्चमध्ये सकाळी ७ वाजता क्रॉसची रॅली काढण्यात आली होती. चर्चपासून शरणपूर परिसरात ही रॅली फिरवण्यात आली व चर्चमध्ये त्याचा समारोप करण्यात आला. नाशिकरोड : गुड फ्रायडे दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी जेलरोड येथे ख्रिस्ती बांधवांनी क्रॉस पुढे हातात पकडून दु:खसदन यात्रा काढली होती. भगवान येशूला वध स्तंभावर खिळून ठार मारले होते. तो दिन ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे म्हणून साजरा करतात. जेलरोड येथील संत आण्णा महामंदिर येथून शुक्रवारी सकाळी ख्रिस्ती बांधवांनी क्रॉस हातात घेऊन पेंढारकर कॉलनी, उत्सव हॉल, शांती कृपा सोसायटी, जेलरोड कोठारी शाळामार्गे पुन्हा महामंदिरपर्यंत दु:ख सदन यात्रा काढली होती. त्यानंतर महामंदिरमध्ये भक्ती प्रार्थना करण्यात आली. दुपारी प्रवचन झाले. नेहरूनगर येथील बाल येशू प्रार्थना मंदिर, मुक्तिधामसमोरील सेंट फिलीप चर्च, देवळाली कॅम्प सेंट पॅट्रिक चर्च, गॅरीसन चर्च येथेदेखील गुड फ्रायडेनिमित्त भक्ती प्रार्थना करण्यात आली.

टॅग्स :Good Friday 2018गुड फ्रायडे २०१८