शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘शब-ए-बरात’निमित्त पूर्वजांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:02 IST

‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कब्रस्तानांमध्ये हजेरी लावून नातेवाइकांच्या कबरींवर पुष्प अर्पण करत फातिहा पठण केले.

नाशिक : ‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कब्रस्तानांमध्ये हजेरी लावून नातेवाइकांच्या कबरींवर पुष्प अर्पण करत फातिहा पठण केले. यावेळी रात्री उशिरापर्यंत कब्रस्तानांमध्ये समाजबांधवांची वर्दळ पहावयास मिळाली. तसेच मशिदींमध्येही सामूहिक नमाजपठणासाठी गर्दी उसळली होती.इस्लामी कालगणनेत सलग तीन रात्री एकापाठोपाठ येतात. शब-ए-मेराजनंतर शब-ए-बरात ही दुसरी रात्र साजरी केली जाते. रमजान पर्व काळात शब-ए-कद्र ही रात्र साजरी केली जाते. या रात्रींचे आगळेवेगळे महत्त्व व वैशिष्ट आहे. शब-ए-बरात या रात्री पाप-पुण्याचा लेखाजोखा अल्लाहच्या दरबारी सादर केला जातो, असे धर्मगुरू सांगतात. या रात्री मुस्लीम बांधव आपापसांत एकमेकांची क्षमा मागत प्रार्थनेत आठवण ठेवा, असे असे सांगताना दिसून आले. अनेकांनी व्हॉट््स अ‍ॅपच्या माध्यमातून आपला ‘माफीनामा’ मित्रपरिवाराला पाठविला. यामुळे शहरातील मुस्लीम बहुल भागात सोशल मीडियावर शब-ए-बरातची चर्चा होताना दिसून आली.सायंकाळपासून जुने नाशिक, वडाळागाव परिसरात शब-ए-बरातची लगबग पहावयास मिळत होती. सायंकाळपासून रात्रीपर्यंत शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठण मुस्लीम बांधवांकडून केले जात होते. दरम्यान, धर्मगुरूंनी प्रवचनातून शब-ए-बरातचे महत्त्व विशद क रत मार्गदर्शन केले. जहांगीर क ब्रस्तानमध्ये पूर्वजांच्या स्मरणार्थ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मौलाना मुश्ताक यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.दर्गा परिसराला यात्रेचे स्वरूपजुने नाशिकमधील हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची बडी दर्गा, आनंदवली येथील हजरत सय्यद रांझेशाह बाबा दर्गा, पांडवलेणीजवळील हजरत सय्यद मलिकशाह हुसेनी बाबा यांच्या दर्ग्यांवर भाविकांनी प्रार्थनेसाठी गर्दी केली होती. यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांनी दर्ग्यांमधील मजारशरीफवर पुष्प, अत्तर, गुलाबजल अर्पण करत फातिहा पठण केले. पहाटेपर्यंत भाविकांची रेलचेल दर्ग्यांच्या आवारात पहावयास मिळाली. दरम्यान, वरील सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम