शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

याद आयें हमारी तो रोना नहीं...पुलवामा हल्ल्यातील शहिदांना 'नेटिझन्स'कडून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 14:03 IST

१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या.

ठळक मुद्दे१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होताभारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले शहिदांचा द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोशलमिडिया हळहळला

नाशिक : 'मै ना लौटा आनेवाले साल जो, मेरी वर्दी बोले मेरा हाल, तो नैना अश्क ना हों...,' 'हम तों सारे वतन को जगा के चले, याद आयें हमारी तो रोना नहीं...,' ये तेरी जमीं, तेरे खुन सें ही तो सजती-सवरती हैं रांझे, तेरी इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती हैं रांझे...' अशा विविध देशभक्तीपर गीतांच्या ओळी दिवसभर सोशलमिडियावर ऐकवयास अन‌् वाचवयास मिळाल्या. दोन वर्षांपुर्वी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या ह्यसीआरपीएफह्णच्या जवानांच्या बलिदानाच्या स्मृती रविवारी (दि.१४) नेटिझन्सकडून ताज्या करण्यात आल्या.जम्मु-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या 'कॅन्वॉय'वर अतिरेक्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ साली जम्मु-काश्मिरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी भर दुपारी आत्मघाती हल्ला केल्याच्या घटनेने देश हादरुन गेला होता. या भ्याड हल्ल्यात भारताला आपले ४० सैनिक कायमचे गमावले होते. रविवारी या हल्ल्यातील शहिदांच्या बलिदानाला दोन वर्षे पुर्ण झाली. शहिदांचा द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोशलमिडिया हळहळला. अनेकांनी व्हॅलेंटाईन दिनाचे सेलिब्रेशन बाजुला ठेवत आपल्या शुरवीर जवानांच्या शहिदांच्या स्मृती जागविल्या. व्हॉटस्ॲपचे स्टेटस, डीपींमध्ये सीआरपीएफच्या जवानांना अभिवादन करण्यात आल्याचे दिसुन आले. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांमध्येही पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच सोशलमिडिया त्या कटु हल्ल्याच्या आठवणींनी गहिवरला होता. 'सीआरपीएफ'नेदेखील त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन शहिदांची छायाचित्रे अमर जवान ज्योतीसह पोस्ट करत शत:शत नमन केले. १४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या. तसेच भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल, जम्मु-काश्मिर पोलीस, सीआयएसएफ आदी सुरक्षा दलांच्या वतीने शहिदांना ट्विटरद्वारे अभिवादन करण्यात आले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदNashikनाशिक