शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांवरील उपचारांमुळे सृष्टीदोष झाले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 18:08 IST

नांदगांव : एखादी घटना माणुसकीला जागी करून जाते तसेच काहीसे कुंदलगाव (ता.चांदवड) येथे घडले. शेतात निंदणी करणाऱ्या महिलेकडून तण समजून कांदेच उपटले गेले. या तिच्या चुकीमुळे शेत मालकाचा पारा चढला. डोळ्यांना निटसे दिसत नसल्याने तिच्याकडून ही चूक झाली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या शेतमालक पंकज खताळ यांनी शोध घेतला असता ग्रामीण भागात अशा अनेक महिला, पुरुष शेतमजूर व लहान मुले आहेत की ज्यांची नेत्र विकारामुळे प्रगती खुंटली असल्याचे दिसून आले.

(संजीव धामणे)नांदगांव : एखादी घटना माणुसकीला जागी करून जाते तसेच काहीसे कुंदलगाव (ता.चांदवड) येथे घडले. शेतात निंदणी करणाऱ्या महिलेकडून तण समजून कांदेच उपटले गेले. या तिच्या चुकीमुळे शेत मालकाचा पारा चढला. डोळ्यांना निटसे दिसत नसल्याने तिच्याकडून ही चूक झाली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या शेतमालक पंकज खताळ यांनी शोध घेतला असता ग्रामीण भागात अशा अनेक महिला, पुरुष शेतमजूर व लहान मुले आहेत की ज्यांची नेत्र विकारामुळे प्रगती खुंटली असल्याचे दिसून आले.खताळ यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली. सर्वांनी नेत्र पिडीतांसाठी काम करायचे ठरवले. आणि त्यातून उभे राहिले नेत्र तपासणी अभियान. नेत्र पीडितांना कशी मदत करता येईल यावर विचारमंथन सुरु असतांना, पंकज यांची पुण्याच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी भेट झाली. नेत्र शस्त्रक्रि या मोफत करून देण्याचा करार हॉस्पिटल व खताळ यांच्यात झाला. १४ आॅक्टोबर २०१८ ते १७ फेब्रुवारी २०१९ या पाच महिन्याच्या कालावधीत अविश्रांत पद्धतीने काम करण्यात आले. १४ आॅक्टोबरपासून दररोज सकाळी पंकज खताळ व डॉ. राजीव खान सैय्यद यांची टीम खेडोपाडी जाऊ लागली. नेत्र तपासणी करू लागली.नांदगाव तालुका, मालेगाव व चांदवड तालुक्याचा काही भाग यातल्या १५० गावांमध्ये एकूण २३० नेत्र तपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली. मनमाड शहरात २८, नांदगांव शहरात १६ व ग्रामीण भागात १८६ शिबिरांमधून ४७५०० रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली गेली. अवघ्या चार महिने व चार दिवसात हे मोठे काम, अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने पूर्ण करण्यात आले. तपासणीच्या दिवसापर्यंत आपली अधू दृष्टी हा नशिबाचा भाग मानूनदिसेल तेवढे जग अनुभवणाºया शेकडो लोकांना चष्मे देण्यात आले. १३८८ मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रि या पुणे येथे देसाई हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. बस भरेल एवढे पेशंट झाले कि, शस्त्रक्रि येसाठी पुण्याला रवाना व्हायचे. नंबरचा चष्मा संपूर्णपणे मोफत देण्यात आला. सर्व काही मोफत दिल ेगेले. समाजरुण म्हणूनच शस्त्रक्रि येनंतर रु ग्णांना घरपोच सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मोतीबिंदुच्या शस्त्रक्रि येसाठी लेन्सची आवश्यकता असते. प्रत्येकी सुमारे ८५०० रु . किंमतीच्या लेन्स, १३८८ रुग्णांच्या डोळ्यात बसविण्यात आल्या. हा सर्व खर्च खताळे कुटुंबीयांनी केला. येवढेच नव्हे तर तिरळे डोळे व जन्मजात नेत्र दोष असलेल्या सहा अल्पवयीन मुलांच्या शस्त्रक्रि या याच कालावधीत मोफत करण्यात आल्या.या मोहिमेकरीता डॉ. तुषार भाकरे, डॉ. अय्याज शेख, प्रमोद साठे, अजित यादव, राजेंद्र कागलकर, मधु खताळ, समीर गुंजाळ, डॉ. सागर कोल्हे, सुदर्शन कोल्हे, अक्षय खताळ आदींनी परिश्रम घेतले.