शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वरी कल्पनेमुळे धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस : रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:36 IST

ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

नाशिक : ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात विवेकधाराच्या वतीने रविवारी (दि.२४) आयोजित पाचव्या नास्तिक मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी कसबे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी कसबे यांनी ‘नास्तिकता : एक जीवनशैली’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पृथ्वीवर दहा लाख वर्षांपूर्वी मानवजाती निर्माण झाली. खरोखर ईश्वर असता तर त्याने त्यापूर्वीच माणूस का बनवला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ‘ईश्वराने माणसाची निर्मिती केली’ हे विधान मान्य करण्यासारखे नाही. ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यास प्रारंभ करायला हवा. माणसाला अन्य कोणत्याही शक्तीने मदत करता तो स्वत:च्या प्रयत्नाने माणूस झाला व त्याने वेगळे जग निर्माण केले. ईश्वरी कल्पना मानवनिर्मित असून, माणूस ईश्वराचा निर्माता आहे, असेही कसबे यांनी यावेळी अधोरेखित केले. लोकेश शेवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रियदर्शन भारतीय यांनी आभार मानले.पालकांचे वर्तन महत्त्वाचेमुलांवर नास्तिकतेचे संस्कार करताना पालकांचे वर्तन व संवाद महत्त्वाचा असल्याचा सूर परिसंवादातून उमटला. ‘नास्तिक पालकत्व : जबाबदारी व आव्हाने’ या विषयावर परिसंवाद यावेळी पार पडला. त्यात लेखक प्रा. अभिजित देशपांडे, मानसशास्त्रज्ञ आशिष कोरडे, स्तंभलेखक योगेश गायकवाड व लेखिका गौरी पटवर्धन यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक