शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नास्तिकांपेक्षाही धर्माचे ठेकेदार अधिक घातक

By admin | Updated: January 29, 2017 00:49 IST

राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश : येवला येथील कार्यक्रमात प्रतिपादन

येवला : नास्तिक लोकांपेक्षाही धर्माचा ठेका घेतलेले धर्मांध ठेकेदार धर्म स्थानात बसून परस्परांची निंदा करत पसरवत असलेला द्वेष हा देखील आतंकवादच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन जैन मुनी राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी येवल्यात केले.येवला मर्चंट को-आॅप. बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित प्रवचनात सात हजार किलो मीटरच्या प्रवासात आलेले अनुभव आणि देशहितासाठी सशक्त पिढी कशी घडेल हे सांगताना आतंकवादाचे विविध पैलू त्यांनी आपल्या प्रवचनात स्पष्ट केले. ते म्हणाले, सर्व प्रकारचा द्वेष दूर सारून परस्परांशी प्रेमाने व चांगुलपनाने संवाद साधल्यास मानिसक शांती मिळेलच त्याचबरोबर प्रगतीही साधता येईल. जाती, धर्म, पंथ, संप्रदायाच्या नावावर माणसा-माणसांत द्वेष पसरवणारे लोकच आतंकवादाचे मूळ आहेत. एकमेकाकडे द्वेषाने पाहणारे देखील आतंकवादी असून, दोन दरोडेखोर एकत्र राहू शकतात; परंतु या देशात दोन साधू एकमेकांचा द्वेष करत एकत्र राहू शकत नाही, हि शोकांतिका आहे. असेही कमलमुनी कमलेश यांनी सांगितले. धर्म हा सध्या पोट भरण्याचा धंदा झाला आहे. धार्मिक कट्टरतेने जीव घेतले जात आहेत. विविध धर्माच्या ठेकेदारांनी आपले विचार बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले . गायींवर राजकारण करणारे देखील गोहत्येला जबाबदार असून गोमाता वाचवण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी यावेळी कमलमुनी कमलेश यांनी केली . यावेळी श्रीराम गोशाळा, वैजापूर गोरक्षा समितीचे हिंदू व मुस्लीम समाजातील विविध कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन विजय श्रीश्रीमाळ यांनी केले. प्रवचनासाठी प्रभाकर झळके, संजय मंडलेचा, हर्षल पारख, गुलाबराव पहीलवान , अजय जैन, आनंद शिंदे, सुभाषचंद संचेती, मधुकर घाटकर, बंटी धसे, शेखर सांबर यांच्यासह पुरु ष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.