शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

दिव्यांग, आजारी शिक्षकांची परीक्षेच्या कामातून मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:28 IST

नाशिकच्या विभागीय शिक्षण मंडळाच्या आढावा बैठकीत शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांच्या होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांग, दुर्धर आजारी असलेल्या शिक्षकांची परीक्षेच्या कामातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक : नाशिकच्या विभागीय शिक्षण मंडळाच्या आढावा बैठकीत शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांच्या होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांग, दुर्धर आजारी असलेल्या शिक्षकांची परीक्षेच्या कामातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.शिक्षक मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, सचिव नितीन उपासनी, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत विभागातील शिक्षक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक नेत्यांसह शिक्षकांनी अरेरावी, दंडाच्या अतिरेकासह मनमानी कारभाराच्या तक्रारींचा पाढा वाचला.मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मंडळातील लिपिक अरेरावी करतात, धड बोलत नाही अशी तक्रारकेली. यावर आमदार दराडे यांनी त्यांचा समाचार घेतला व तुमचे कारनामे वरपर्यंत मांडण्याची वेळ येऊ देऊ नका,असे सुनावले. यावेळी शिक्षकांच्या मागणीनुसार केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक यांना उत्तरपत्रिका तपासणी कामातून मुक्त करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. मान्यतावर्धीत व कायम करण्यासाठी दंड रक्कम माफ करून फाईलचा प्रवास शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे न देता थेट विभागीय मंडळात देऊन दंड आकारणी करू नये तसेच २ हजार रुपये आकारून मान्यतावर्धीत व कायम करण्याची सूचना मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी मांडली. हा प्रश्न मंत्रालयातून सोडवण्याचे आश्वासन आमदार दराडे यांनी दिले. पेपर तपासणीचे मानधन वाढवले पाहिजे यावर संघटना अग्रेसर होत्या. मंडळातील लिपिक दिलीप जाधव यांच्याबद्दल तर शिक्षकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. जाधव यांना बैठकीत बोलावण्याच्या सूचना करण्यात आल्यावर त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. केंद्र देताना आर्थिक व्यवहार होतात, असा आरोप संजय चव्हाण यांनी केला. मागील सभेचे इतिवृत्त न मिळाल्याने शिक्षक सेनेचे संजय चव्हाण चांगलेच भडकले. दिव्यांग शिक्षक, दुर्धर आजाराने त्रस्त शिक्षकांनाही परीक्षा कामातून मुक्त करण्याची सूचना संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, मोहन चकोर, एस. बी. शिरसाठ, भाऊसाहेब सोनवणे यांनी मांडली अन् त्यास सचिवांनी तत्त्वत: मान्यता दिली. यावेळी शिक्षक नेते दिगंबर नारायणे, राजेंद्र सावंत, पुरुषोत्तम खकिबे, बी. के. नागरे, भरत गांगुर्डे, कलीम शेख, एन. वाय. पगार, एम. व्ही. बच्छाव, आर. एस. गायकवाड, राजेंद्र महात्मे, शिवाजी गाडेकर, एम. एन. देशमुख, विजय म्हस्के आदी उपस्थित होते.धमकावल्याची तक्रारअनुदानासाठी विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला असताना शिक्षकांना मंडळातून फोन करून धमकावले जाते, अशी तक्रार विभागीय अध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर यांनी या बैठकीत केली. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रDivyangदिव्यांग