नाशिक : वडाळानाक्यावरील राजवाडा परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन जनांवरांची भद्रकाली पोलिसांनी सुटका केली असून दोघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ या संशयितांकडून एक पिकअप व्हॅनही पोलिसांनी जप्त केली आहे़खडकाळी परिसरातील रहिवासी संशयित मोहमद आरिफ मोहमद काशमोदीन शेख याने महिंद्र पिकअपमध्ये (एमएच १५, डीके ७७३२) एक काळ्या रंगाची जर्सी गाय व एक राखाडी रंगाची गाय बेकायदेशीर कत्तल करण्याचे उद्देशाने चारापाणी न देता ठेवल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार रविवारी (दि़२) सकाळी सात वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पिकअप व्हॅन व गायी असा २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ या प्रकरणी संशयित अफजल शेख विरोधात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप जप्त करण्यात आले आहे़
डांबलेल्या जनावरांची भद्रकाली पोलिसांकडून सुटका
By admin | Updated: April 3, 2017 13:30 IST