शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

चणकापूर कालव्याला पूरपाणी सोडल्यामुळे देवळा तालुक्यातील जनतेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:51 IST

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देधरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असली तरी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यात एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे, पाझर तलाव, बंधारे, नद्या-नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.रिमझीम पावसामुळे खरीपाच्या पीकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चणकापुर धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.दरवर्षी रामेश्वर धरण (७८.१४ द.ल.घ.फू) पूरपाण्याने भरल्यानंतर पुढे उजव्या वाढीव कालाव्याला पाणी सोडून पूर्व भागातील लहान मोठे साठवण बंधारे भरण्याचे नियोजन दरवर्षी करावे लागते. यामुळे शेती सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटण्यास मदत होते. पाणी सोडल्यानंतर मात्र लाभक्षेत्रातील ह्या गावांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.गतवर्षी या ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कालव्याला सोडलेल्या पाण्याचे वाटप करण्यासाठी गावागावातील वादविवाद टाळत नियोजनपूर्वक तोडगे काढले होते. पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत पाण्याची गळती रोखत पुरपाण्याच्या वितरणात महत्वाची भूमिका बजावली होती.डिसेंबर महिन्यात लोकसहभागातून चणकापूर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत वाढीव कालव्याची वहन क्षमता दिडपट वाढविण्यासाठी कालव्याची आवश्यक तेथे उंची वाढवणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे आदी उपाय करून वहन क्षमता वाढविण्यात आली. त्याचा ह्या वर्षी लाभ होईल. चालू वर्षी वाढीव कालव्याला पाणी सोडल्यानंतर पूर्व भागातील लाभक्षेत्रात येणार्या गावांना पाणी पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींना परीश्रम घ्यावे लागणार आहेत.अंदाजपत्रकाप्रमाणे चणकापूर उजव्या कालव्याची चणकापूर येथे सुरवातीची वहन क्षमता १८४.१९ क्युसेक्स असून रामेश्वर येथे शेवटी ती ७५ क्युसेक्स आहे. कालव्याच्या सदोष कामामुळे १२० क्युसेक्सपेक्षा अधिक क्षमतेने कालव्याच्या निर्मितीपासून एकदाही पाणी सोडता आलेले नाही. तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे.