शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तुरळक सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 00:05 IST

देवगांव : अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. त्यामुळे भातपिकांना ...

ठळक मुद्देभातपिकांना संजीवनी : देवगाव परिसरात समाधान

देवगांव : अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. त्यामुळे भातपिकांना ओलावा मिळून नवसंजीवनी मिळणार असल्याने, चिंतेत असलेल्या बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यासह दक्षिण भागातील शेतकरी बांधवांनी जूनच्या पहिला आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणी केली होती. मात्र, काही रोपे माळरानावर असल्याने त्यांना नियमित पावसाची गरज असते. पंधरा दिवसांपासून देवगांव परिसरातील गावांमध्ये सर्वत्र कडक उन्हाने कहर केला होता. त्यामुळे उन्हामुळे पेरलेली रोपेही करपू लागली होती. पंधरा दिवसांत पावसाचा एकही थेंब न पडल्याने लावलेली रोपे ओलाव्याअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने, देवगांव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे. पावसाच्या सरींमुळे ही पिके आता पुन्हा तग धरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जर दोन-तीन दिवस पाऊस असाच कोसळत राहिला, तर उर्वरित शेतकऱ्यांची उरलेली कामे लवकर मार्गी लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.- गत दोन वर्षे अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, तर त्या आधीच्या वर्षी अखेरच्या वेळी पाऊस न पडल्याने भातपिके करपून गेली होती, तर या वर्षी भात लागवडीसाठी रोपे तयार झाली असतानाही वेळेवरच पाऊस गायब झाल्याने मोठे संकट निर्माण होते.- वेळेत भातलावणी न झाल्यास पिकावर परिणाम होतो. भातांची दिवस मर्यादा असल्याने, काही भातपिके ९०, ११० हलवार तर काही १२०, १३५-४० गरवी पिके, यामुळे जर अधिक कालावधी रोपट्यात गेल्यास, त्याची उमेद तेथेच जाते. त्यामुळे शेतात लागवड केली, तरी नंतर त्याची वाढ होत नाही. परिणामी, दाणा पोसला जात नाही.पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने भातपिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुसलेल्या पावसाचे आगमन झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने भातपिकांमध्ये ओलावा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.- अविनाश झोले, शेतकरी, टाकेदेवगाव.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस