जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे शुक्र वारी ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण व विकासकामांचे भूमिपूजन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य अनिल पाटील, शैलेश सूर्यवंशी, सचिन सावंत, पंचायत समिती सदस्य व बागलाणचे उपसभापती वसंत भामरे, भास्कर बच्छाव, जोरणचे भूमिपुत्र डॉ. विश्वास सावकार आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा जोरण ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच आक्काबाई माळी, सुभाष सावकार, मंगलबाई कौतिक, भिला सावकार, केदा सावकार, महादू सावकार, धर्मा सावकार, तुळसीदास सावकार, विद्या बेडिस, धनंजय सावकार, सुरेश बेडिस यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
जोरण येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण
By admin | Updated: January 25, 2016 22:51 IST