शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात पडलेल्या बैलाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:30 IST

नाशिक : वडाळा शिवारातील खोडेनगर येथील एका खासगी बांधकाम प्रकल्पाच्या खड्ड्यात बुधवारी (दि.२९) दुपारी एक बैल अनवधानाने पडला.

नाशिक : वडाळा शिवारातील खोडेनगर येथील एका खासगी बांधकाम प्रकल्पाच्या खड्ड्यात बुधवारी (दि.२९) दुपारी एक बैल अनवधानाने पडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान व प्राणिप्रेमी घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या ते एक तासाच्या प्रयत्नांनंतर बैलाला बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने बैलाला कोणतीही इजा झालेली नाही.वडाळा गावातील खोडेनगर शिवारात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेत असल्याने यापूर्वीदेखील दुर्घटना घडली आहे. संत सावता माळी रस्त्याला लागून खोडेनगरच्या रस्त्याजवळ एक बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी पाया खोल खोदण्यात आला आहे.माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच इको इको या वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक, विठ्ठल रुखमाई ट्रस्टचे सुनील माधव खोडे, माजी नगरसेवक सुनील खोडे हेदेखील पोहचले. यावेळी प्राणिप्रेमी व जवानांनी परिश्रम घेत बैलाला बाहेर काढले. दरम्यान, अशाप्रकारे बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्याची गरज असून, भविष्यात होणारे अपघात टाळावे, अशी मागणी सुनील खोडे यांनी केली आहे. सुदैवाने मुक्या जिवाचे प्राण वाचले तसेच लहान मुलेदेखील पडण्याचा धोका संभवतो त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक