शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाकडून टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:49 IST

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील ...

ठळक मुद्देबँक खात्याची मागवली मागणी : शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारपर्यंत तपशील देण्याच्या सूचना

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीन आधार संलग्न बँक खात्याची माहिती तत्काळ मागविण्यात आली आहे.शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत परीक्षा शुल्क माफीस पात्र तथा अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये अवेळी पावसामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांनाही राज्य मंडळांने सूचित केले असून याविषयीची सविस्तर माहिती मंडळाच्या ह्यफी रिफंडह्ण संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थीनिहाय भरून संकेतस्थळ‌ावर सबमिट केल्यानंतर यादीच्या शेवटी देण्यात आलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक, प्राचार्य यांना स्वाक्षरीसह प्रमाणित करून अपलोड करावे लागणार आहे. यानुसार बँक खात्याचा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सोमवारपर्यंत (दि. १५) ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.प्रतिपूर्तीचा लाभ थेट बँक खात्यातपरीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरून एनईएफटी अथवा आरटीजीएसद्वारे विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ही माहिती वेळत राज्य मंडळाला मिळणे आवश्यक आहे. ही वेळत उपलब्ध न झाल्यास या लभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिपूर्ण माहिती निर्धारित कालवधीत मंडळाला सादर करण्याच्या सूचना विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षा