शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जोखमीच्या व्यवसायात काम करणाऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:51 IST

सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व वरील क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी संबंधित व्यवसाय करत असल्याच्या पुराव्यासह नगर परिषद कार्यालयात नावनोंदणी करावी व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे.

ठळक मुद्देसिन्नर : नगर परिषदेचा दारिद्र्य निर्मूलनासाठी पुढाकार

सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व वरील क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी संबंधित व्यवसाय करत असल्याच्या पुराव्यासह नगर परिषद कार्यालयात नावनोंदणी करावी व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे.नगर परिषदेद्वारे केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी करण्याचे कार्य चालू आहे. शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलन करणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अभियानाच्या माध्यमातून शहरी गरीब व्यक्तींना उदरनिर्वाहाकरिता विविध घटकांद्वारे साहाय्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर या माहितीचे संकलन केले जात आहे.जोखमीचे किंवा धोकादायक क्षेत्रामध्ये कामा करणाऱ्या कुटुंबाची, व्यक्तींची यादी कामगार आयुक्त कार्यालय, हमाल पंचायत, स्वच्छता कामगार संघटना, सामाजिक संघटना, कचरावेचक कामगार संघटना किंवा संस्था यांच्याकडून उपलब्ध करून घेण्याचे कार्य नगर परिषद स्तरावर तयार करण्यात येत आहे.५० बचतगटांना बँकेच्या माध्यमातून वार्षिक ४ टक्के व्याजदराने जवळपास ४६ लाख रु पयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. अभियानांतर्गत महिलांना गट संकल्पना, नेतृत्व विकास व बदल तसेच आर्थिक साक्षरतेबाबत प्रशिक्षण देणे, बँकेचे व्यवहार, विमा याबाबत माहिती दिली जात आहे. अभियानाचे कार्य यापुढे चालू राहणार आहे. शहरी भागातील जोखमीचे किंवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिलांचे बचतगट तयार करून त्यांनादेखील वरीलप्रमाणे लाभ उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी दिली.२१.९० लाखांचा फिरता निधी वितरितसामाजिक अभिसरण व संस्थात्मकबांधणी या घटकाच्या माध्यमातून शहरी गरीब महिलांचे बचतगट तयार करून या बचतगट वस्तीस्तरीय संघास जोडणे व वस्तीस्तरीय संघ हे शहरस्तरीय संघास एकत्र जोडले जात आहेत. डिसेंबरअखेर २२८ बचतगट स्थापन करण्यात आले असून, ११ वस्तीस्तरीय संघ व १ शहरस्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. जवळपास २५१८ महिलांचे संघटन झाले आहे. २१९ प्रत्येकी १० हजार याप्रमाणे २१ लाख ९० हजार रुपयांचा फिरता निधी अभियानांतर्गत वितरित करण्यात आला आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरbusinessव्यवसाय