शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार नवमतदारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:23 IST

आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनादेखील नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या नवीन मतदारांच्या नोंदणीनंतर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आता ४५ लाख ५८ हजार १८६ इतकी झाली आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनादेखील नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या नवीन मतदारांच्या नोंदणीनंतर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आता ४५ लाख ५८ हजार १८६ इतकी झाली आहे.मतदान यादीत पारदर्शकता यावी आणि निर्दोष मतदारयादी तयार करण्यात यावी यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी व्यापक मतदार जागृती अभियान राबविण्यात येऊन याद्यांची पडताळणी करण्यात आली होती. या मोहिमेतून सुमारे ५४ हजार इतकी दुबार नावे वगळण्यात आली तर नवीन नोंदणीतून जवळपास १७ हजार नवीन मतदारही जोडले गेले. त्यामुळे गेल्या ३१ आॅगस्ट रोजी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार ४५ लाख ३३ हजार ६३९ अंतिम मतदारांची यादी तयार करण्यात आली होती.अंतिम मतदारयादी तयार झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रमदेखील जाहीर केला होता. या कार्यक्रमादरम्यान जे नवमतदार मागील महिन्यातच १८ वर्षांचे झाले, परंतु त्यांचे नाव नोंदविणे शक्य नव्हे अशा नवमतदारांसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा मतदारांसाठी ४ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणीची मुदत जाहीर केली होती.या कालावधीत सुमारे अडीच हजार नवमतदारांनी जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून नाव नोंदणीला प्रतिसाद दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार २४,५४७ इतक्या नवमतदारांनी आपली नावे नोंदविण्याला प्राधान्य दिले आहे. बहुतांश तरुणांनी स्वत:हून निवडणूक शाखेत जाऊन आपली नावे नोंदविली.—इन्फो—राज्यात पाच लाख नवमतदारांची नोंदणीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात ४ आॅक्टोबर पर्यंत नव्याने ४ लाख ९० हजार ५० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० अशी झाली आहे. राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वांत जास्त म्हणजेच ५ लाख ५७ हजार ५०७ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच एकूण २ लाख ३ हजार ७७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय