शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ‘नो-हॉँकिंग’अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:07 IST

‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली.

नाशिक : ‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली. वाढते शहरीकरण व दिवसेंदिवस रस्त्यावर वाढणारी वाहने यामुळे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधिरपणाला निमंत्रण देणारा ठरत आहे. वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आता नाशिक पोलीस आयुक्तालयानंतर प्रादेशिक परिवहन विभागानेही जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला सोमवारी परिवहन कार्यालयाच्या आवारातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन विभागाने उपस्थित टॅक्सीचालक, रिक्षाचालकांना ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा प्रचार-प्रसार करणाºया कॅप दिल्या. तसेच वाहनांच्या दर्शनी भागावर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ असे शाब्दिक आवाहन असलेले स्टिकर लावण्यात आले. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्यासह आदि अधिकारी व टॅक्सी, वाहतूक, स्कूल बसचालक रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  रस्त्यांवर कमाल वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर एवढी असावी, तसेच रस्त्यांवरून वाहतूक करताना हॉर्नचा अनावश्यकरिता केला जाणारा वापर टाळावा या दोन निकषांवर आधारित परिवहन विभागाने स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत सहभागी होणाºया वाहनचालकांकडून विहित नमुना अर्ज भरून घेण्यात आला.अशी पार पडली स्पर्धाया स्पर्धेत सुमारे तीस वाहनचालक सहभागी झाले होते दुचाकी-चारचाकी वाहनचालकांसाठी असलेल्या या स्पर्धेचा मार्ग पेठ फाटा (भक्तिधाम) डावीकडे वळण घेत निमाणीस्थानक, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार, शरणपूररोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाकामार्गे पेठ फाट्यावरील परिवहन विभागाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला. या मार्गावर सहभागी स्पर्धक वाहनचालकांवर पर्यवेक्षकांनी नियंत्रण ठेवत अर्जावर विहित नमुन्यात नोंदी नोंदविल्या. यामध्ये प्रामुख्याने हॉर्न किती वेळा वाजविला व ताशी ४० कि.मी.ची वेगमर्यादा किती वेळा ओलांडली यावर गुणांकन करण्यात आले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस