शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीत पेट्रोल देण्यास नकार; पेट्रोल पंपाच्या मॅनेजरचे डोके फायटरने फोडले

By अझहर शेख | Updated: October 8, 2023 15:11 IST

हल्लेखोरांनी पवार यांना बेदम मारहाण करत जखमी केल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरून पळ काढल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे

नाशिक - वडाळागावाजवळ सावता माळी कॅनॉल रस्त्यावर असलेल्या देवरे पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला दुचाकीने आलेल्या चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे दुचाकीस्वारांनी फायटरने हल्ला केल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

खोडेनगर कॅनॉलरोडला लागून असलेल्या एम.एस.देवरे पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून फिर्यादी तुषार बापू पवार (३३,रा.राजसारथी सोसा.) हे नेहमीप्रमाणे नोकरीवर हजर झालेले होते. शनिवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पवार हे पंपावरील कॅबिनमध्ये बसून कामकाज करत असताना तेथे दुचाकीने आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने ‘तू इकडे ये रे...’ असे म्हणून पवार यांना कॅबीनबाहेर बोलावून घेतले. ‘मला बाटलीत पेट्रोल पाहिजे आहे, मला तू किंवा तुझ्या लोकांना सांग पेट्रोल देण्यास असे त्या इसमाने सांगितले. पवार यांनी त्यास शासकिय नियमानुसार बाटलीत पेट्रोल देता येत नाही, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून त्याने मोबाइलवरून कोणाला तरी कॉल केला. यानंतर तेथे अजुन दोन ते तीन तरूण दुचाकीने आले. या चौघांनी मिळून संगनमताने पवार यांना मारहाण केली.

हाताच्या चापटीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून त्यांच्यापैकी एका अज्ञात व्यक्तीने लोखंडी फायटरसारख्या वस्तूने डोक्यावर प्रहार केल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. डाव्या कानाच्या वरच्या भागात डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी व मालकांनी कॉलेजरोडवरील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा सगळा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. मुंबईनाका पोलिसांनी पवार यांच्या जबाबावरून अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा शाोध सुरू केला आहे.

जीवे मारण्याची दिली धमकीहल्लेखोरांनी पवार यांना बेदम मारहाण करत जखमी केल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरून पळ काढल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. बळजबरीने बाटलीत पेट्रोल मागून कर्मचाऱ्यांसोबत अथवा अशाप्रकारे व्यवस्थापकासोबत वाद घालण्याचे प्रकार शहर व परिसरातील पेट्रोल पंपांवर वारंवार घडत असतात. यामुळे अनेकदा कर्मचारीसुद्धा भीतीपोटी चोरीछुप्या पद्धतीने बाटलीत पेट्रोल देऊन मोकळे होतात.