शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावी अध्यापनासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:15 IST

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अध्यापनाचे काम करतानाच अध्ययनही करणे आवश्यक असल्याने प्राध्यापकांचा वेगवेगळ्या स्तरावर ज्ञान आणि कौशल्य विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व विद्यापीठाकडून उजळणी वर्ग (रिफ्रेशर कोर्स) करणे सक्तीचे केले आहे. अशा कोर्समुळे शिक्षकांचा सर्वांगीण विकास साधून विद्यार्थीहित आणि समाजहित साधले जाणार असल्याने नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’ संधी असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी केले.

ठळक मुद्देअरविंद शाळिग्राम : प्राध्यापकांच्या कौशल्यविकासासाठी यूजीसीकडून सक्ती

नाशिक : शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अध्यापनाचे काम करतानाच अध्ययनही करणे आवश्यक असल्याने प्राध्यापकांचा वेगवेगळ्या स्तरावर ज्ञान आणि कौशल्य विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व विद्यापीठाकडून उजळणी वर्ग (रिफ्रेशर कोर्स) करणे सक्तीचे केले आहे. अशा कोर्समुळे शिक्षकांचा सर्वांगीण विकास साधून विद्यार्थीहित आणि समाजहित साधले जाणार असल्याने नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’ संधी असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी केले.गुरुवारी (दि. ११) माजी आमदार तथा संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजळणी वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले की, एकाच वेळी विषय समजावून सांगण्यासाठी नवनवीन कल्पनांच्या आधारे शिकविणे आवश्यक आहे. इंटरनेट व समाजमाध्यमांमुळे विद्यार्थ्यांकडे वेगवेगळी माहिती सहजरीत्या उपलब्ध असते. परंतु त्याविषयी ज्ञान असेलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकविण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. व्ही. एस. मोरे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर, डॉ. राजेंद्र भांबर, विंचूर दळवी डॉ. रवींद्र देवरे, डॉ. ए. व्ही. पाटील, डॉ. एन. बी. पवार, डॉ. विनीत रकिबे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. डॉ. ए. व्ही. पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठ