नाशिक : विविध देशांत फिरण्याचा आणि राहण्याचा योग आला. मात्र भारताला असे बनवा की कुणाचीही इतर देशांत जाण्याची इच्छा होऊ नये. भारतात विचार आणि स्वच्छता यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. त्यासाठी घराघरात शौचालयाची निर्मिती व्हावी, वृक्षलागवडीचा उपदेश देत ग्रीन इंडिया क्लिन इंडियाची संकल्पना राबविण्याची भूमिका स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्टचे जगद्गुरू हंसदेवाचार्यजी महाराज यांनी व्यक्त केली. पर्यावरण परिषदेत त्यांनी आपले विचार मांडले.भारतातील विचार आणि शौचालयांची स्थिती चिंताजनक असून, कोट्यवधी रुपये खर्च करून सुवर्ण मंदिरे बनविली जातात. मंदिरांचे दरवाजे सोन्याचे आहेत. मात्र त्यांच्या एका कोपऱ्यातही भाविकासाठी शौचालय दिसून येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बदल आपल्याला कथा, परिषदांच्या माध्यमातून घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. भाविकांचे विचार परिवर्तन होण्याची गरज आहे. कथा, सत्संगाच्या माध्यमातून देशातील व्यथा दूर करण्यासाठी प्रयत्न झाल्यास लोकांच्या विचारात बदल घडवून आणणे शक्य आहे. मंदिरासाठी पैसा खर्च होतो. मात्र शौचालयाची व्यवस्था होत नाही, हा विरोधाभास असल्याचे त्यांनी म्हटले. (प्रतिनिधी)
ग्रीन इंडिया क्लिन इंडिया परिषदेत विचारमंथन
By admin | Updated: September 4, 2015 00:42 IST