शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
3
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
4
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
6
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
7
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
8
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
9
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
11
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
12
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
13
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
14
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
15
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
16
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
17
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
18
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
19
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
20
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

आरोग्य उपसंचालकांची  संदर्भ सेवेला अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:27 AM

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात मंजूर नसलेली पदे भरून सरकारची फसवणूक करण्याच्या प्रकाराबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच, त्याची दखल घेत आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षकासह अन्य अधिकाऱ्यांना जाब विचारला.

नाशिक : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात मंजूर नसलेली पदे भरून सरकारची फसवणूक करण्याच्या प्रकाराबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच, त्याची दखल घेत आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षकासह अन्य अधिकाऱ्यांना जाब विचारला. रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबद्दल अवगत असलेल्या रावखंडे यांनी जी पदे मंजूर नाहीत व रुग्णालयात रुग्णांवर उपचाराची साधने नाहीत, अशा ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करण्यामागच्या षडयंत्राचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर न देता वैद्यकीय अधीक्षकांनी सारवासारव केल्याचे सांगण्यात आले.सकाळी ११ वाजता उपसंचालक डॉ. रावखंडे यांनी संदर्भ रुग्णालयास भेट देऊन अगोदर पाहणी केली तसेच तत्काळ अधिकाºयांची बैठक बोलावून दररोज वृत्तपत्रात येत असलेल्या नवनवीन गोंधळ व अनागोंदीच्या वृत्ताबाबत विचारणा करून धारेवर धरले. अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची पदे मंजूर नसताना भरण्याची कारणे काय याबाबत जाब विचारला. एवढेच नव्हे तर राज्य सरकारने विचारणा केल्यास काय उत्तर देणार, असा सवालही केला. त्यावर रुग्णालयाची गरज म्हणून सदरची पदे भरल्याचे शासनाला कळविण्याचे ठरविण्यात आले. कॅन्सरवर उपचार करणाºया रेडिओथेरेपी यंत्रणा बंद असल्याबाबतही यावेळी चर्चा झाली. त्यावर यंत्र सुरू असल्याचे भासविण्यात आले.  रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुपारी रुग्णालयात जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. बंद पडलेली यंत्रसामग्री, रुग्णांशी केली जाणारी अरेरावी, स्वच्छता कर्मचाºयांकडून होणारे उपचार अशा बाबींचा ऊहापोह करून व्यवस्थापनाला धारेवर धरण्यात आले. पदे मंजूर नसलेल्या डॉक्टरांना त्वरित सेवामुक्ती द्या, अशी मागणी करून येत्या दहा दिवसांत कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका किरण दराडे, दीपक दातीर आदींनी दिला.देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्षशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सदरची यंत्रणा खरेदी केली असून, तिच्या देखभाल दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे कॅन्सर पीडितांवर उपचार करण्यात अपयश येत असतानाही रुग्णालय व्यवस्थापनाने उपसंचालकांना दिशाभूल करणारी माहिती सादर केली. विशेष म्हणजे रुग्णालयाला नको असलेली पदे भरण्यात रस दाखविणाºया रुग्णालयाने कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मेडिकल अंकोलिस्ट हे पदच भरलेले नाही. त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याचेही समोर आले .

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर