शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

संदर्भ रुग्णालयात आंदोलन : वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:08 IST

राष्टवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले.

नाशिक : राष्टवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले.  उत्तर महाराष्टतील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून २००८ साली विभागीय संदर्भ रुग्णालय उभारण्यात आले; मात्र सद्यस्थितीत रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयाची लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागत आहे. त्याचबरोबर गेल्या दोन आठवड्यांपासून हृदय बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे यंत्र बंद अवस्थेत असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.अशात राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धडक मोर्चा काढीत याबाबतची तक्रार केली. त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी लवकरात लवकर सर्व सुविधा सुरू करणार असल्याचे आश्वासन  दिले.यावेळी महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, नगरसेवक समिना मेमन, हिना शेख, रंजना गांगुर्डे, प्रतिभा भुजबळ, विभागीय अध्यक्ष आशा भंदुरे, सलमान शेख, शकिरा शेख, सुरेखा निमसे, सुजाता कोल्हे, मीनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, सईदा शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसhospitalहॉस्पिटल