शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बसफेºयांमध्ये कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:32 IST

पंचवटी शहर बस आगाराने नाशिक सीबीएस ते कसबे सुकेणे या शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात केल्याने या मार्गावरील हजारो चाकरमाने, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाच्या कृपेने ओझर-सुकेणे मार्गावर अवैध प्रवाशी वाहतूक मात्र जोमात सुरू असून, प्रवाशी संतप्त झाले आहेत.

कसबे सुकेणे : पंचवटी शहर बस आगाराने नाशिक सीबीएस ते कसबे सुकेणे या शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात केल्याने या मार्गावरील हजारो चाकरमाने, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाच्या कृपेने ओझर-सुकेणे मार्गावर अवैध प्रवाशी वाहतूक मात्र जोमात सुरू असून, प्रवाशी संतप्त झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळ नाशिक महानगरात तोट्यात चाललेली शहर बससेवा काही मार्गावर बंद करण्याचा निर्णय घेत असून, त्याचाच भाग म्हणून नाशिकसह लगतच्या ग्रामीण भागातील शहर बसफेºयांमध्ये कपात केली जात आहे. कसबे सुकेणे, ओझर ही गावे नाशिक महानगराशी निगडित असून, या भागातून दररोज हजारो प्रवाशी, चाकरमाने, विद्यार्थी नाशिक शहरात ये-जा करतात. ओझर-सुकेणे ही शहर बससेवा या प्रवाशांना वरदान ठरली असताना, दोन महिन्यांपासून या मार्गावरील बसफेºयांमध्ये कपात केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. नाशिक, सातपूर, अंबड, विल्होळी, आडगाव, पंचवटी, नाशिकरोड, गरवारे, दहावा मैल या भागातील विविध कंपन्या, कार्यालये, तसेच महाविद्यालयांत या भागातील अनेक चाकरमाने, विद्यार्थी दररोज ये- जा करतात. सध्या बसफेºयांमध्ये कपात केल्याने प्रवाशांना दररोज लेटमार्क होत असून, वेळेच्या अपव्यय होत आहे. दरम्यान, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, भाऊसाहेबनगर, ओणे, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, थेरगाव, ओझर, शिलेदारवाडी आदी भागातील प्रवाशी, विविध सामाजिक व राजकीय संघटना महामंडळाच्या या निर्णयामुळे आक्रमक झाल्या आहेत. नाशिक सीबीएस ते ओझर-टाऊनशिप- सुकेणे या मार्गावरील कपात केलेल्या शहर बसफेºया पूर्ववत सुरू कराव्यात, मनपाने बससेवेबाबत योग्य तो  निर्णय घेऊन या मार्गावर बससेवा कायम ठेवावी, पिंपळगाव, लासलगाव, येवला या आगारांनी निफाड-पिंपळस- सुकेणे- ओझर - नाशिक या मार्गावर साधी बससेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.प्रवाशी संघटना दाखल करणार याचिका४नाशिकमधील शहर बससेवा राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात आहे. एसटीकडून बसफेºयांमध्ये कपात केल्याने होत असलेल्या त्रासाला सर्वसामान्य प्रवासी त्रयस्थ झाले आहेत. कसबे सुकेणे परिसर प्रवाशी संघटना याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रवासी संघटेनचे अध्यक्ष योगेश सगर, उत्तम कातकाडे, विजय औसरकर, सुदाम जाधव, संतोष वाघ यांनी दिली.अवैध प्रवाशी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्षशहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात झाल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला अच्छे दिन आले आहेत. नाशिक ते ओझर व ओझर ते सुकेणे या मार्गावर प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. काळीपिवळी व आॅटो रिक्षाचे चालक अक्षरश: कोंबून प्रवासी वाहतूक करत आहेत. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, केवळ शहर बसफेºयांमध्ये कपात या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.