शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

टोमॅटोची लाली ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:18 IST

पिंपळगाव बसवंत : येथील उत्पन्न बाजार समितीत गेली चार महिने तेजीत असलेले टोमॅटोचे दर अवघे एक रुपया किलोवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोचे कॅरेट २० रूपयांना विकले जात आहे.

ठळक मुद्दे पिंपळगाव बसवंत : एक रुपया किलोने विक्री, शेतकरी हवालदिल

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात टोमॅटोचा हंगाम असतो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी टोमॅटोला उच्चांकी बाजार २० किलोच्या कॅरेटला २५५ पासून ९०१ पर्यंत डिसेंबर या कालावधीत दर मिळाला. परंतु जानेवारीत अवघे २० रूपयांवर आल्याने टोमॅटोवर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला. ऑगस्ट महिन्यातच टोमॅटोला ४०० ते ८८५ रूपयांपर्यंत दर प्रति कॅरेट मिळताच या पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वर्ग पुन्हा वळला गेला. यावर्षी द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना टोमॅटोमुळे चांगलाच आर्थिक फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष बाग लॉक डाऊनकाळात सापडल्याने आठ ते दहा रूपये दराने द्राक्ष द्यावे लागले होते. यातीलच काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केल्याने कमी दिवसात द्राक्षापेक्षाही जास्त पैसे मिळाले. एकरी जवळपास पंधरा लाख रूपयापर्यंत उत्पन्न मिळाल्याने अनेक शेतकरी फायद्यात होते. यंदा अनेक राज्यात टोमॅटो लागवड करण्यात आली. दुबई. बांगलादेश आदी भागात स्थानिक टोमॅटोचे पीक आल्याने भारतातून मागणी बंद झाल्याने टोमॅटोचे दर कमी झाले . मागील वर्षी बाजार समितीत १ कोटी ४० लाख ३२ हजारपर्यंत कॅरेट टोमॅटोची झाली होती. बाजारभाव पण चांगले होते. जवळपास ४८७ कोटी ६५ लाखांची आर्थिक उलाढाल बाजार समितीत झाली. यावर्षी लॉकडाऊन असताना देखील जवळपास १ कोटी ४९ लाख कॅरेटची आवक बाजार समितीत आली होती. यातून ६५५ कोटी ३१ लाखांची आर्थिक उलाढाल बाजार समितीत झाली. मागील वर्षाच्या तुलनेत १६८ कोटींची उलाढालीत वाढ झाली. यावर्षीच टोमॅटोचा दर डिसेंबर महिन्यापर्यंत २५५ ते ७०० पर्यंत होता. जानेवारीत अचानक १ ते २ रूपये किलोवर आला. यंदा अनेक राज्यात टोमॅटो लागवड करण्यात आली. दुबई. बांगलादेश आदी भागात स्थानिक टोमॅटोचे पीक आल्याने भारतातून मागणी बंद झाल्याने टोमॅटोचे दर कमी झाले .शेतकरी आधीच लॉकडाऊनमध्ये द्राक्ष सारख्या पिकात होरपळून निघाला. शेतकरी वर्गाला टोमॅटो लागवडीसाठी आवाहन केले व त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत गेला. परिणामी अनेक शेतकरी वर्गाची नुकसान टोमॅटोमुळे भरून निघाली. या मुळे शेतकरी व बाजार समितीस आर्थिक फायदा झाला.- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समितीमाझे द्राक्ष लॉकडाऊन काळात अवघे सात रूपये दराने विक्री झाले होते. मोठा फटका सहन करत एकच एकर टोमॅटो लावले पण जवळपास पंधरा लाखापर्यंत उत्पन्न मिळाल्याने खूप बरे झाले. त्यामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान भरून निघाले.- सुभाष शिंदे, शेतकरी, शिंदे ता.चांदवड

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती