शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

रेडगाव खुर्द-सोनीसांगवी रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: October 23, 2015 22:15 IST

वाहनधारक त्रस्त : डांबरीकरणाची मागणी

तळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द ते सोनीसांगवी या तीन किमी अंतराच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना आपण चाललोय तो रस्ता आहे की नाही हेच कळत नाही इतके खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण होते की खडीकरण हे समजणेदेखील शक्य नाही. काजीसांगवीला माध्यमिक शिक्षणाकरिता रेडगाव खुर्द परिसरातील १००-१२५ विद्यार्थी सायकलने जातात. या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सायकलवरून पडणे, सायकली नादुरुस्त होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, वाहेगाव साळ, काळखोडे येथील नागरिक खराब रस्त्यामुळे तालुक्याच्या गावी जाताना साळसाणे मार्गे पाच किमी अधिक अंतराने जाणे पसंत करतात. या सर्वच गोष्टींचा विचार करता या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)