शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

शहरात घोंगावले ‘लाल वादळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:00 AM

‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नाशिक : ‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य परिषदेने नाशिक-मुंबई अशी लांब पदयात्रा जाहीर केल्याने यासाठी राज्यातील आदिवासी महिला-पुरुष बिºहाडासह शहरात धडकले. हजारो मोर्चेकऱ्यांना एकत्र जमण्यासाठी मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक रिकामे करून देण्यात आले होते. दुपारी बारा वाजेपासून मोर्चेकºयांचे जत्थे येण्यास सुरुवात झाली. हातात लाल बावटे घेऊन मोर्चेकरी महामार्ग बसस्थानकात दाखल होत होते. दुपारी ४ वाजता ‘लॉँग मार्च’ शहरातून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल, असे ठरले होते. मात्र रात्री बसस्थानकातच मुक्काम करण्याचे निश्चित झाले़ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी किसान सभेच्या नेत्यांना शासकीय विश्रामगृहावर बोलविले होते. या चर्चेतून ते सरकारच्या वतीने शेतकºयांच्या अमान्य मागण्यांवर तोडगा काढणार होते.डॉ. अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ‘लॉँग मार्च’साठी राज्यभरातून किसान सभेचे कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.चटणी, भाकर अन् ठेचा...दुपारी बारा वाजेपासून पोहचलेल्या मोर्चेकºयांनी सोबत बांधून आणलेली शिदोरी उघडत चटणी, भाकर अन् ठेचावर ताव मारत भूक भागविली. यावेळी काही मोर्चेकरी महिलांनी हातात धरलेले रेशन मागणीच्या फलकांनी लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ महिला, पुरुषांनी चक्क चटणी-भाकर खाऊन मोर्चात सहभागी होण्याचा केलेला निर्धार सरकारविरोधी एल्गार दाखविणारा ठरला.गिरीश महाजन हेलिकॉप्टरने दाखलकिसान सभेचा मोर्चा नाशिक-मुंबई असा जाणार असल्याचे समजल्यानंतर सरकारकडून चर्चेसाठी तत्काळ हेलिकॉप्टरने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील अधिकाºयांसोबत आढावा बैठक घेत जिल्ह्यातील मोर्चेकºयांची स्थिती जाणून घेतली. रात्री दहा वाजता त्यांनी किसानसभेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू केली.मुंबई नाक्यावरील वाहतूक विस्कळीत४संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ईदगाह मैदानाकडून आलेल्या मोर्चेकºयांच्या मोठ्या जत्थ्याने अचानकपणे महामार्ग बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मुंबई नाका पोलीस ठाण्याशेजारी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबई नाका चौकात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. मोर्चेकºयांनी सुमारे अर्धा तास ठिय्या देत सरकारच्या विरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चJ.P. Gavitजे.पी. गावित