शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याच्या मुहूर्तावर  रेड्यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:40 IST

वर्षानुवर्षांची परंपरा जतन करीत बलिप्रतिपदेच्या निमित्ताने  गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

पंचवटी : वर्षानुवर्षांची परंपरा जतन करीत बलिप्रतिपदेच्या निमित्ताने  गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटी परिसरात रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दुग्ध व्यावसायिक व भाविक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.  सायंकाळी रेड्यांची आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर विविध संदेश लिहिण्यात आले होते. रेड्यांच्या पाठीवर काढलेले विविध स्वच्छता अभियान, देवदेवतांचे चित्र, विविध संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी दुग्ध व्यावसायिकांनी रेड्यांची सजावट करून पूजन व आरती केली. त्यानंतर सायंकाळी नाग चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर मिरवणूक मार्गावरील गंगाघाट, म्हसोबा महाराज,पंचवटी कारंजा, दिंडोरी रोड येथील म्हसोबा महाराज मंदिरात रेड्यांना दर्शनासाठी नेण्यात आले. पंचवटी परिसरातील नाग चौक, कृष्णनगर, सरदार चौक, जुना आडगाव नाका, नांदूर, मानूर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, आडगाव परिसरातील शेकडो दुग्ध व्यावसायिकांनी पंचवटीत बलिप्रतिपदानिमित्ताने रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढली होती.  यावेळी भास्कर शिंदे, सुनील शिंदे, मारुती शिंदे, दिगंबर धुमाळ, दिगंबर मोगरे, सतनाम राजपूत, संतोष कांबळे, संदीप देशमुख, विकी जाट, एकनाथ धुमाळ, भूषण शिंदे, सागर गरड, विकी शिंदे, गोपी आव्हाड, अजित शेळके, महेश कल्याणकर, राहुल बोडके, दीपक शिंदे, प्रकाश शिंदे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक