शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांदा दरात १०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:21 IST

उमराणे : होळी व मार्च एण्डमुळे गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून बंद असलेल्या येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. सोमवारी पहिल्याच दिवशी कांदा विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्देनऊ दिवसांनंतर बाजार समित्या सुरू : आवकेत वाढ, उन्हाळी कांद्याचे दर लाल कांद्याच्या तुलनेत काहीअंशी तेजीत

उमराणे : होळी व मार्च एण्डमुळे गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून बंद असलेल्या येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. सोमवारी पहिल्याच दिवशी कांदा विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

परिणामी आवक वाढल्याने मागील आठवड्यातील बाजारभावाच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली असून, सर्वोच्च ८५० रुपये दराने विकला गेला, तर नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीस येऊ लागला असून, त्याचे दर स्थिर राहत सर्वोच्च १२०१ रुपयांपर्यंत विकला गेला.चालूवर्षी उन्हाळ ( गावठी ) कांदा लागवडीसाठी बहुतांशी शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे नसल्याने कांदा लागवडीकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी केले होते. परंतु उन्हाळी म्हणून लागवड केलेले कांदे लाल निघाल्याने एकीकडे फसवणूक तर झालीच; परंतु हा कांदा विक्रीशिवाय पर्यायही नसल्याने शिवाय गेल्या आठ दिवसांपासून बाजार समितीला सुट्टी असल्याने हा कांदा शेतातच पडून होता. त्यामुळे बाजार समिती केव्हा सुरू होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.बाजार समितीचे कामकाज सुरू होताच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाल कांदा विक्रीसाठी येथील बाजार समितीत एकच गर्दी केली होती. परिणामी आवक वाढल्याने लाल कांद्याच्या दरात शंभर रुपयांची घसरण होत कमीत कमी ४०१ रुपये, जास्तीत जास्त ८५० रुपये तर सरासरी ६०० रुपये दराने विकला गेला, तर याउलट लाल कांदा दराच्या तुलनेत उन्हाळी कांद्यांचे दर तिनशे ते चारशे रुपयांनी जास्त असून, त्यांना कमीत कमी ४०० रुपये, जास्तीत जास्त १२०१ रुपये, तर सरासरी ९५० रुपयांपर्यंत विकला गेला. बाजार आवारात १८०० ट्रॅक्टर, ३५० पिकअप आदी वाहनांमधून सुमारे तीस ते पस्तीस हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड