शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

प्रत्येक घरासमोर लाल रंगांच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 16:36 IST

चांदोरी : कुत्र्यांचे वाढते प्रस्त आणि त्यांचा होणारा त्रास दुर करण्यासाठी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामिण भागात सद्या प्रत्येक घराच्या दारासमोर लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या ठेवलेल्या दिसत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील अनेक गावात गल्ली व पार्किंग, ओटा, गल्ली, घरासमोर लाल कलरच्या बाटल्या दिसत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे. या बाटल्या भटक्या श्वानांचा प्रतिबंध करण्यासाठी ठेवल्या जात असल्याचा नागरिकांचा भ्रम आहे. मात्र अशा प्रकारांमुळे श्वानांचा प्रतिबंध होतो यावर प्राणीशास्त्रानुसार कोणतेही तथ्य नसल्याचा दावा पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देचांदोरी : कुत्र्यांचा त्रास टाळण्यासाठी केला जातो प्रकार

चांदोरी : कुत्र्यांचे वाढते प्रस्त आणि त्यांचा होणारा त्रास दुर करण्यासाठी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामिण भागात सद्या प्रत्येक घराच्या दारासमोर लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या ठेवलेल्या दिसत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील अनेक गावात गल्ली व पार्किंग, ओटा, गल्ली, घरासमोर लाल कलरच्या बाटल्या दिसत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे. या बाटल्या भटक्या श्वानांचा प्रतिबंध करण्यासाठी ठेवल्या जात असल्याचा नागरिकांचा भ्रम आहे. मात्र अशा प्रकारांमुळे श्वानांचा प्रतिबंध होतो यावर प्राणीशास्त्रानुसार कोणतेही तथ्य नसल्याचा दावा पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे.सध्यातरी लाल बाटलीची करामत किती दिवस चालणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.शहर व ग्रामीण भागात अनेक प्रथा झपाट्याने विकसित होतात. अशातच घर व परिसरात कुंकवाच्या मदतीने लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या तयार करून ठेवल्या जातात. या परिसरात मोकाट श्वान फिरत नसल्याचा दावा अनेक नागरिक करतात. मात्र याबाबतप्राणीशास्त्रानुसार कोणतेही तथ्य नसून हा केवळ भ्रम असल्याचा दाव प्राणीमित्रांकडून केला जात आहे. या लाल बाटली बाबत मतभिन्नता असली तरी सध्या शहर व ग्रामीण परिसरात अशा लाल बाटल्या रस्त्याच्या कडेला लक्षवेधी ठरत आहेत.श्वानांमध्ये कलर ओळखण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे या विशिष्ट रंगामुळे श्वानांना भीती बसते. मोकाट श्वानांच्या फिरण्यावर परिणाम होतो. ही संकल्पना शास्त्रीय निकषानुसार चुकीची आहे.- डॉ. सुनील अहिरे, निफाड तालूका पशुवैद्यकीय अधिकारी. 

टॅग्स :talukaतालुकाdogकुत्रा