शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात सोडले भोजापूर धरणातून आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:23 IST

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तोडगा

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.भोजापूर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन २७ नोव्हेंबर रोजी भोजापूर धरणातून लाभक्षेत्रातील गावांसाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचवेळी फुलेनगर बंधाºयात आरक्षित पाणी सोडावे, यासाठी वावी परिसरातील शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. सदर आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी वावी परिसरातील शेतकºयांनी लावून धरली होती. त्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी वावी परिसरातील शेतकºयांनी कालव्यात बसून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.त्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणारे आवर्तन लांबले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी धरण पसिररात संवेदनशील भागाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी चार वाजता २५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात धरणातून ७० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले.संगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरु राहणार आहे. यावेळी पाटंबधारे विभागाचे शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, बी. के. आचट यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.शेतकºयांनी घेतली वाजे यांची भेटआमदार राजाभाऊ वाजे यांनी आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर, वावी व सायाळे येथील शेतकºयांची वावी येथे भेट घेऊन चर्चा केली. वाजे यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांच्यासोबत शेतकºयांची फोनद्वारे चर्चा घडवून आणली. यावेळी सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, सुधाकर भगत यांच्यासह काही शेतकरी उपस्थित होते.१२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तनसंगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरू राहणार आहे.